You are currently viewing भाजप चित्रपट कामगार आघाडी देवगड तालुका अध्यक्षपदी तन्वी योगेश चांदोसकर यांची निवड

भाजप चित्रपट कामगार आघाडी देवगड तालुका अध्यक्षपदी तन्वी योगेश चांदोसकर यांची निवड

देवगड

भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या देवगड तालुका अध्यक्षपदी तन्वी योगेश चांदोसकर यांची निवड करण्यात आली. या संघटनेचे सिंधुदुर्गभाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या देवगड तालुका अध्यक्षपदी तन्वी योगेश चांदोसकर यांची निवड करण्यात आली.

या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व अभिनेते संतोष तेली यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी देवगड नगराध्यक्ष प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष माजी आमदार अजित गोगटे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, भाजपाचे पदाधिकारी शरद ठुकरूल ,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, महिला तालुकाध्यक्ष उशकला केळुसकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या संघटनेच्या तालुका उपाध्यक्ष म्हणून प्रशांत मिराशी, चंद्रशेखर तेली, सौ शितल आचरेकरयांची नेमणूक करण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, संजय केनेकर कामगार नेते, गणेश ताठे -( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ), भाजपा कामगार आघाडी विजय सरोज – ( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ), भाजपा चित्रपट कामगार आघाडी सत्यवान गावडे -( महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ), भाजपा चित्रपट कामगार आघाडी, रविंद्र महाडीक-( महाराष्ट्र प्रदेश सचिव ) जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. देवगड तालुका चित्रपट निर्मितीमध्ये आघाडीवर राहील, देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळे यानिमित्ताने जगासमोर येतील व स्थानिकांना यातून रोजगार मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष तन्वी चांदोसकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =