You are currently viewing घाल घाल पिंगा वाऱ्या……

घाल घाल पिंगा वाऱ्या……

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री संजना जुवाटकर लिखित अप्रतिम ललित लेख*
—————-

*शीर्षक:- घाल घाल पिंगा वाऱ्या……….*
—————————————————

*घाल घाल पिंगा वाऱ्या*
*माझ्या परसात*
*माहेरी जा सुवासाची*
*कर बरसात…..*

माझ्या अंगणात पिंगा घालणारा हा वारा माझ्या मन पटलावर कधी पिंगा घालू लागला समजलेच नाही. बघता बघता मनमोर माहेरच्या अंगणात जाऊन पोचले सुध्दा..आणि ….आणि तिथे कधी श्रावणसरींमध्ये न्हाऊन थुईथुई नाचू लागले ..कळलेच नाही.

*मन माझे गाऊ लागले*
*साठवणींचे गाणे*
*अलवार उघडू लागली*
*आठवणींची पाने…….*

मीही मग लहान होऊन आईच्या पदराला पकडून साऱ्या घरभर हिंडू लागले..आणि आठवणींचे ते मायेचे पदर हळूहळू उलगडू लागले. आईच्या प्रत्येक कामात माझी नुसती लुडबूड….घरातला प्रत्येक कोपरा माझ्या सहवासाचा….माझी भावंडे माझा श्वास….किती खेळलो आम्ही एकत्र….एकमेकांबरोबर घालवलेले हासरे, खोडकर क्षण…मैत्रिणी आणि भावंडे मिळून लपाछपी, लगोरी, दोरीउड्या, झोपाळा, झिम्मा– फुगड्या…..आणि भातुकली …ती..तर कोण आणि कशी विसरणार…..त्या तिथे कोपऱ्यात दुपारी आई झोपली की हळूच खेळातली नवरा नवरी सजवून… …सजवायचे साहित्य पण भारीच……दोन चार बारीक काट्या, सुत आणि शिंपिन मावशीच्या तिथून तिने टाकून दिलेले सुंदर, नक्षीदार कपड्यांचे तुकडे….आईने कुठेतरी ठेवलेले मणी जमवून मंगळसूत्र आणि माळा बनवून नवरा नवरीला घालायचे आणि ..मग लागले लग्न…..केव्हढा हा आनंद…. खेळही संपायचे नाहीत आणि आईचा ओरडाही…..

*घरातल्या कानाकोपऱ्यात*
*मायेने चिंब भिजत होते मी*
*कधीतरी पाहुणी होईन या घरची*
*ठाऊक नव्हते मज काही….*

थोडी मोठी झाल्यावर माझ्या अभ्यासाची जागा म्हणजे गुरांच्या गोठ्यातील स्वच्छ मोकळी जागा….खुर्ची टाकून अभ्यास करता करता खूप मायेने मी माझ्या सोनी गाईला बघायची. …हो… खरंच सोनेरी केसांची, सुंदर, चमचमती अंगकांती आणि पाणीदार तेजस्वी डोळे….तिचे वासरू गौरी अगदी तिच्यासारखेच…. गोरे ….गोरे. मी अभ्यास करता करता सोनीच्या अंगावरून हात फिरवायची …तीही मला मायेने चाटायची…..काय तो मायेचा स्पर्श…..मनात एकदम गोड अनुभूती यायची. मी निरीक्षण करायची..सोनी गौरीला मायेने जवळ घेऊन तिच्या अंगावरुन चटाचटा जीभ फिरवायची…. काय ते वात्सल्य…..मलाही मग गाय आणि माझी माय यातील फरक तो काय? असा प्रश्न पडायचा.

*माया, ममतेची धार*
*दुधावरील मऊ साय*
*जणू संस्कारांची खाण*
*माझी आई माझी माय……*

हो…..माझी आई म्हणजे माझा जीव की प्राण वाटायची मला. मी शाळा, महाविद्यालयातून येताना घराच्या जवळ आल्यावर घराच्या उघड्या दरवाजातून माझी नजर आधी आईला शोधायची… आई दिसल्यावर सारा शीण गायब….घरातही तिच्या पायातील जोडव्यांचा आणि हातातील बांगड्यांचा आवाज म्हणजे तिच्या प्रेमळ अस्तित्त्वाची खूण….मायेचा अखंड वर्षाव…..भावा बहिणींची साथ….अंगणात बहरणारी अबोली, गुलाब, अनंत, जास्वंद यांची सुवासिक सोबत…सकाळीच सर्वांच्या आधी उठून फुललेले गुलाब ओंजळीत घेऊन आधी त्याचा मनमुराद सुगंध घ्यायचा आणि मग ते अलवार तोडायचे…तेव्हाचा तो दवबिंदूंचा होणारा स्पर्शही मनाला ताजेतवाने बनवायचा.

असे हे माझ्या घरचे मायेचे बंध मी मोठी होता होता मनाला आणि शरीराला कधी परके करून गेलेत कळलेच नाही. आईच्या सुसंस्कारित पदराशी खेळता खेळता….भातुकलीच्या खेळातील नवरा नवरीचे लग्न लावता लावता …….

कशी विसरू मी ती रात्र……आईच्या कुशीत घट्ट विसावलेली….हळदीच्या ओल्या अंगाची…शगुनाच्या रंगलेल्या मेंदीची..निवांत झोपली माझी सोनुली….त्या माऊलीला वाटले होते मात्र…..पण…..पण…..माझ्या गालांवर ओघळणारे तिचे अनावर अश्रू……हुंदका दाबून पुसण्यातच गेली होती हो माझी रात्र….

*न आवरणाऱ्या हुंदक्यांनी उंबरठा ओलांडून*
*झाले होते मी माहेरवाशीण*
*आणि विद्याधर रावांचे नाव घेऊन*
*झाले मी हो सासुरवाशीण……*

………..आणि या पिंगा घालणाऱ्या वाऱ्याने पुन्हा मला भानावर आणले….आता या दूतरुपी वाऱ्याला सांगते माझा निरोप…….

*जा रे वाऱ्या जा ..माझ्या माहेरी*
*पहा कशी आहे माझी माऊली*
*सांग..सौख्य नांदते माझ्या सासरी*
*सुखी आहे तुझी..तुझी तान्हुली…..*

सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.

 

*संवाद मिडिया*

*👩‍🎓शिक्षण नगरी पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण आता आपल्या सावंतवाडीत* 👨‍🎓

📚 *GURU GLOBAL SCHOOL* 📚
*we care we create*

🥳 *उद्घाटन समारंभ: 2 एप्रिल रविवार 2023* 🥳

🤼‍♀️ *समर धमाका कॅम्प* 🤼‍♀️

*👧फक्त 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी 👦*

*♦️Guru Global School ♦️*
*⛹🏻‍♂️WE CARE WE CREAT* 🧗🏻‍♀️
*💢An ISO 0012015 certified 💢*

🧘🏻‍♂️🥊🏇🏻🤾🏻‍♂️🏒🏓🪁🤺🏂🛼🎿

🌤️ *समर कॅम्प* 🌤️

*🏏10 एप्रिल ते 30 एप्रिल 🏏*

*🥍वेळ:सकाळी 10 ते दुपारी 12.30 🥍*

🛼 *Activities ( उपक्रम)* 🛼

*🏋🏻‍♀️थिम बेस ॲक्टीव्हीटी 🪗*
*⛷️लिटल ॲस्ट्रोनट 🪂*
*🤽🏻‍♀️क्ले मोडलिंग 🎿*
*🤾🏻‍♂️इन डोअर गेम 🏂*
*🤺स्टोरी टेलिंग 🪁*
*🥌स्टीम बेस्ड ॲक्टीव्हीटी 🏒*
*🏇🏻आर्ट & क्राप्ट 🛷*
*🧘🏻‍♀️योगा & मेडीटेशन 🧘🏻‍♂️*

🏃‍♀️ *Hurry up* 🏃‍♂️

*✡️मोजक्याच जागा उपलब्ध✡️*

🏇🏻 *आजच संपर्क करा आणि तुमच्या पाल्यांचा सर्वांगिण विकास करा* 🧘🏻‍♂️

*📱9922903515*
*📱9422633433*
*📱9172693343*

*जाहिरात लिंक*👇

———————————————-

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा