You are currently viewing वैभववाडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व हवालदार लाच लुचपतपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात

वैभववाडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व हवालदार लाच लुचपतपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात

वैभववाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिवाजी पाटील व पोलीस नायक मारुती संतराम साखरे हे दोघे वीस हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपतपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. विनयभंगाच्या गुन्ह्यात आपल्याला अडकवू ही भीती दाखवून चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती. ३० हजार रुपयांची तडजोड होऊन त्यातील पहिले २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात सापडल्याने सिंधुदुर्ग पोलीस खात्यात खळबळ उडाली. गुरुवारी ही कारवाई होऊन या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

वैभववाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरज शिवाजी पाटील यांच्या समक्ष याच पोलीस ठाण्याच्या पोलीस नायक मारुती संतराम साखरे याने ही २० हजार रुपयाची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना अँटी करप्शनच्या जाळ्यात रंगेहात पकडले गेले. या पोलिस ठाण्याच्या कक्षेतील भादवि ३७६ च्या एका गुन्ह्यात अडकवू अन्यथा ४० हजार रुपये द्या अशी मागणी या दोघा पोलिसांनी केली होती. या ३० हजार रुपयाची तडजोड झाली होती. त्यातील २०००० रुपये स्वीकारत असताना अँटी करप्शन च्या पथकाने या दोघांना रंगेहात पकडले.

अँटी करप्शन विभागाच्या ठाणा परिक्षेत्राचे अधीक्षक सुनील लोखंडे व उपाधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग चे उपअधीक्षक दीपक कांबळे यांनीही कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक भार्गव फाले, पोलीस हवालदार अजित खंडे, कांचन प्रभू, श्री रेवडेकर, श्री परब, श्री पालकर व श्री पेडणेकर या अँटी करप्शन पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा