You are currently viewing धान खरेदी पोर्टलवर नोंदणी करिता शेतकऱ्यांना मुदतवाढ

धान खरेदी पोर्टलवर नोंदणी करिता शेतकऱ्यांना मुदतवाढ

आमदार वैभव नाईक यांची माहिती

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२१-२२ मध्ये विकेंद्रीत धान व भरडधान्य योजनेतर्गत धान व भरडधान्य (भात)खरेदी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. याबाबत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार शासनाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी आदेश पारित केले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की, पुरेशा प्रमाणावर शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या नसल्यास सदर शेतकरी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही, त्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नोंदणीकरिता दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे असे आदेशात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 2 =