आज महाराष्ट्रात भाजपा तर्फे घंटानाद
भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने ओरोस येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

आज महाराष्ट्रात भाजपा तर्फे घंटानाद

आज महाराष्ट्रात भाजपा तर्फे घंटानाद, ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशा घोषणा

महाराष्ट्रात मंदीर उघडी व्हावी अशी भाजपाची मागणी

आज संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा तर्फे ‘दार उघड उद्धवा दार उघड‘ अशा घोषणा देत सर्व मंदिरांसमोर घंटानाद करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने ओरोस येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही सर्व मंदिरे भाविकांसाठी उघडी करावीत, हा इशारा राज्य सरकारला देण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग युवामोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख मंदार पडवळ, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, ओरोस शहर अध्यक्ष पांडुरंग मालनकर, युवामोर्चा चिटणीस शुभम राठीवडेकर व इतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा