You are currently viewing सावंवाडीत रंगणार “स्वरानुबंध” मैफील

सावंवाडीत रंगणार “स्वरानुबंध” मैफील

सद्गुरू संगीत कला व सांस्कृतीक मंडळ व सैनिक नागरी पतसंस्था सावंतवाडी यांचे आयोजन

सावंतवाडी

श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व सैनिक नागरी पतसंस्था सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करणारे व जिल्ह्यातील सांगितिक पटलावर मानाचे स्थान असलेले विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालय,सावंतवाडी यांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त “स्वरानुबंध” या संगीत मैफिलीचे आयोजन सोमवार दिनांक २ मे २०२२ रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे सायंकाळी ठीक ५:३० वा करण्यात आले आहे सदर संगीत मैफिल कै. गुरुवर्य रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांचे शिष्य (सद्गुरू संगीत विद्यालयाचे माजी विद्यार्थी) सादर करणार आहेत.
तरी सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व सैनिक नागरी पतसंस्था सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =