-उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे
सिंधुदुर्गनगरी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 2022-2023 आर्थिक वर्ष 2021-2022 च्या तुलनेत महसूल वसुलीमध्ये 13.56 कोटीची म्हणजेच 32 टक्के इतकी वाढ झाली आहे. त्याशिवाय वाहन नोंदणीमध्ये दुचाकी 2400,चारचाकी 212 तर परिवहन संवर्गात 525 ची वाढ झाल्याची माहिती माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी दिली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील विविध वसुलीच्या माध्यमातून सुमारे 56 कोटी 52 लाख उत्पन्न मिळाले यामध्ये मोटार सायकल नवीन नोंदणी- 10 कोटी 75 लाख, कार नवीन नोंदणी 19 कोटी 85 लाख, परिवहन संवर्गातील नवीन वाहने 1 कोटी 55 लाख, जुना कर-3 कोटी 67 लाख, परिवहन वाहनांचा कर 6 कोटी 9 लाख, पर्यावरण कर 1 कोटी 17 लाख, रस्ता सुरक्षा सेस 68 लाख, शुल्क 8 कोटी 89 लाख, तडजोड शुल्क (दंड) 2 कोटी 86 लाख, प्रवासी कर 1 कोटी 1 लाख अस एकूण 56 कोटी 52 लाख महसूल वसुली झाली आहे.
नवीन वाहन नोंदणी कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून एप्रिल 2022 ते मार्च 2023 कालावधीत जिल्ह्यात दुचाकी 10 हजार 647, चारचाकी 1 हजार 844 परिवहन 1 हजार 590 अशा एकूण 14 हजार 81 नवीन वाहनांची नोंद झाली आहे. गत आर्थिक वर्ष सन 2021 -2022 च्या तुलनेत दुचाकी वाहन नोंदणीमध्ये 2 हजार 400, चारचाकी 212 व परिवहन संवर्गातील वाहनामध्ये 525 ची वाढ झाली आहे.
वायुवेग पथकाने वार्षिक लक्षांक (तडजोड शुल्क) 1 कोटी 25लाख असून वार्षिक पूर्तता 1 कोटी 30 लाख इतकी केली आहे. याचे प्रमाण 104 टक्के आहे गत वर्षीच्या तुलनेत 39.97 टक्के इतकी वाढ आहे. सीमा तपासणी नाक्यांवरील कामगिरीमध्ये वार्षिक लक्षांक 2 कोटी इतका होता त्याची वार्षिक पूर्तता 100 टक्के करण्यात आली तर तडजोड शुल्क वार्षिक पूर्तता सुमारे 1 कोटी 94 इतकी होती तर बाहेरील राज्यातून येणाऱ्या वाहनावरील कर 1 कोटी 40 लाख असा एकूण 3 कोटी 35 लाख 9 हजार इतका जमा झाला असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले.