You are currently viewing छंदामुळे व्यक्तिमत्व विकासास मदत होते – शिक्षणाधिकारी डाॅ.कमळकर

छंदामुळे व्यक्तिमत्व विकासास मदत होते – शिक्षणाधिकारी डाॅ.कमळकर

*छंदामुळे व्यक्तिमत्व विकासास मदत होते – शिक्षणाधिकारी डाॅ.कमळकर*

*बांदा*

सध्याच्या रोजच्या धावपळीच्या युगात जीवनात वेगळेपण मिळवून देण्याचे काम छंद देत असतो शालेय जीवनापासून छंद जोपासणे आवश्यक असून छंदामुळे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो तसेच कुतुहल वाढते व या कुतुहलातून सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे वाईट बाबीकडे व्यक्तीचा ओढा जात नाही. छंदामुळे व्यक्तिमत्व विकासास मदत होते असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ कमळकर यांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा येथे विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या उन्हाळी छंदवर्गाच्या कार्यशाळेत केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर बांदा केंद्रशाळेत उन्हाळी छंदवर्गाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे या छंदवर्गाला शिक्षणाधिकारी डॉ. कमळकर यांनी भेट देऊन शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, शोभराज शेर्लेकर , धनंजय मेंगाणे आदि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांच्या हस्ते करण्यात आले.हा छंदवर्ग यशस्वी पार पाडण्यासाठी उपशिक्षक रंगनाथ परब, शांताराम असनकर,जे.डी.पाटील, इन्सुली शाळेचे कलाशिक्षक हंसराज गवळे,फ्रान्सिस फर्नांडिस,स्नेहा घाडी,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, मनिषा मोरे, सपना गायकवाड,सुजाता सावंत, स्नेहा कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी शिक्षणाधिकारी यांनी शाळेत राबविण्यात येत उपक्रम आदर्शवत असल्याचे सांगून शाळेतील विविध स्पर्धात्मक उपक्रमात सुयश मिळवलेल्या व नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा