देवगड
स्कुटी विक्री करण्याचा बहाण्याने मोबाईल मधील गुगल पे व फोन पे या ॲपसद्वारे १ लाख २० हजार ४० रूपये एवढी रक्कम पाठविण्यास सांगून देवगडमधील सुमित गणपत जुवाटकर(३३) या युवकाला ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी पोलीसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना १० फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनूसार, देवगड जूने पोलीस स्टेशनच्या मागे राहत असलेल्या सुमीत गणपत जुवाटकर(३३) या युवकाला दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री १० ते ११ फेब्रुवारी दुपारी २.३० वा.दरम्यान स्कूटी विक्री करण्याचा बहाण्याने प्रयाग वर्मा व नितेश कुमार अशी नावे सांगणाऱ्या व्यक्तिंनी प्रथम २ हजार रूपये कुरीयरसाठी, १८ हजार रूपये मुळ गाडीची किंमत, इन्शुरन्स करीता १५,१२०, इन्शुरन्स करीता वेगळे १५ हजार व १२० रूपये तसेच टड्ढान्झॅक्शन जास्त झाल्याने २० हजार, राऊंड होण्याकरीता मनाली कुळकर्णी यांच्या गुगल पे द्वारे १९,५६० अशी एकूण १,२०,०४० एवढ्या रकमेची फसवणुक केल्याची तक्रार सुमीत जुवाटकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून पोलीसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करीत आहेत.