You are currently viewing बांदा येथे हनुमान जयंती उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन 

बांदा येथे हनुमान जयंती उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन 

बांदा येथे हनुमान जयंती उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन

बांदा

बांदा उभाबाजार येथील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात* प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही *हनुमान जयंती* उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त  *दोन दिवस* विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
उत्सवाच्या पुर्वसंध्येला सोमवार दि. २२ एप्रिल रोजी रात्रौ ठिक ७.३० वाजता *स्थानिकांच्या पारंपरिक वार्षिक भजनसेवेने उत्सवाचा आरंभ* होईल.
रात्री १०.०० वा. *आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘रुई महात्म्य’* हा
पौराणिक नाट्यप्रयोग
सादर होईल.
मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ठीक ६.०० वा.
*श्री हनुमान जन्म सोहळा* होऊन पारंपारिक *श्री हनुमान फेरीला आरंभ* होईल.
सायं. ठीक ४.००वा.श्री *रामनाम जप* होणार आहे. यात भाविकांनी सहभाग घ्यावा. सायं. ठीक ५ ते ६.०० वा.
*श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन सेवा मंडळ बांदा* यांची भजन सेवा होईल.
सायं. ठीक ७.३० वा.
प्रसिध्द कीर्तनकार
*ह.भ.प.श्री. हरिहर नातु बुवा* यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
सर्व भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन *श्री हनुमान सेवक मंडळ बांदा* आणि *सिद्धेश शिरोडकर* यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा