You are currently viewing श्री देव कुणकेश्वर मंदिर आज पासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले…

श्री देव कुणकेश्वर मंदिर आज पासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले…

२० हजार दिवे पेटवून दीपोत्सव होणार साजरा…

देवगड
कोरोना संक्रमण काळात बंद असलेले श्री देव कुणकेश्वर मंदिर आज पासून भाविकांना दर्शनासाठी खुले आहे. कोरोनाविषाणू सारखी जागतिक महामारी आल्यानंतर वाढणारे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वत्र लॉकडाऊन करण्याचे जाहीर केले. त्यानुसार सर्व क्षेत्रात लॉकडाऊन केल्यामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली होती. टप्याटप्प्याने काही गोष्टीसुरू झाल्याही होत्या. मात्र, भाविकांना जिव्हाळ्याचे श्रद्धास्थान असलेले गावागावातील मंदिरेही अद्याप सुरू झाली नसल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी दिसत होती. अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना संक्रमण काळात राज्यभरातील १८ मार्चपासून बंद असलेली मंदिरे सोमवार दि. १६ नोव्हेंबर दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खुली करण्याचा निर्णय जाहीर करताच राज्यभरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. बंद असलेल्या मंदिरांमुळे गावातील उत्सव साजरे करताना मंदिरा ट्रस्टीसमोर एक मोठा प्रश्नच निर्माण झाला होता. शासनाने परवानगी दिल्यानंतर गावागावातील मंदिरांमध्ये नवरात्र उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता.
दिवाळीच्या कालावधीत राज्यभरात असणाऱ्या बहुतांशी मदिरांमध्ये दीपावली पाडवा हा उत्सव मंदिरासमोर लक्ष लक्ष दिवे पेटवुन हा उत्सव साजरा केला जातो. मात्र यावेळी कोरोनाच्या स्थितीमुळे या वर्षीच्या दीपोत्सव हा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय स्थानिक मंदिर कमिटीने घेतला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचा आदेश जाहीर होताच राज्यभरातील भाविकांचा आनंद द्विगुणित झाला. यावर्षी २०२० साल असल्याने श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे २० हजार दिवे पेटवून कुणकेश्वर ग्रामस्थ दीपोत्सव साजरा करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + seventeen =