You are currently viewing कोणी जागा देतां का जागा ? कोकणात प्रकल्पांना कोणी जागा देतां का? ..

कोणी जागा देतां का जागा ? कोकणात प्रकल्पांना कोणी जागा देतां का? ..

आयुर्वेदीक वनस्पतीवर संशोधन करणा-या प्रकल्पाला शिवसेना सरकार सिंधुदुर्गात आडाळीत जागा देईल का ?

नानार नको,
सि वर्ल्ड नको , आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन केंद्र नको तर ठाकरे सरकारला हवे काय ?

माजी आ. प्रमोद जठार यांचा राज्य सरकारला सवाल

कणकवली  :

आता आणखी काय केले तर केंद्राच्या या पर्यावरण पुरक आयुर्वेदीक वनस्पतीवर संशोधन करणा-या प्रकल्पाला शिवसेना सरकार सिंधुदुर्गात आडाळी येथे जागा देईल ? हेच का ठाकरे सरकारचे कोकणावरचे प्रेम ? असे खोचक सवाल माजी आ. प्रमोद जठार यांनी राज्य सरकारला केले आहेत. खुद्द केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सिंघुदुर्गात प्रकल्प व्हावा म्हणुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती करतात आणी कोकणाच्या आमदारांच्या जिवावर उभे असलेले ठाकरे सरकारचे मंत्री प्रकल्प लातुरला पळवतात. असल्या सरकारचा त्रिवार धिक्कार करत त्यांनी परत एक सवाल केला आहे, नानार नको, सि वर्ल्ड नको , आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन केंद्र नको तर ठाकरे सरकारला हवे काय ? कोकणाचा विकास कसा करायचा आहे यांचे उत्तर शिवसेनेच्या खासदारांना सिंधुदुर्गातील तसेच कोकणातील जनतेला द्यावेच लागेल. असे सांगत आ. प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकार वर टिका केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − sixteen =