You are currently viewing *ना—दानवीर कर्ण . थोडक्यात पण पूर्ण

*ना—दानवीर कर्ण . थोडक्यात पण पूर्ण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम रचना*

*ना—दानवीर कर्ण . थोडक्यात पण पूर्ण*

एका राजाच्या राजकन्येनं
दुर्वासांनी दिलेल्या पहिल्या मंत्राचा प्रयोग केला अन्
रविराजानं *नियोग* केला ?
भास्कराचे अंशुमी कुंतीच्या कानाशी कुजबुजले
अन्………
कर्णाने कुंतीच्या गर्भाशयाचा आश्रय घेतला
कर्णानं नकळत घेतलेलं प्रथम दान होतं….
……आश्रय दान !!

कुंती प्रसूत झाली कारण……
तिला माहित नव्हतं जन्माला येणारा
*सूतपुत्र* होणार आहे म्हणून !
अग्निदेवतेजवळ मागितलेलं दान
जलदेवतेला समर्पित केलं गेलं….. भीतीनं !
दानवीराचेच दान झाले….न मागता ?
अनाथ झाला होता एक राजपुत्र
अन्
राजकन्येची राजपत्नी झाली नंतर कुंती.

नंतर……….
अतिरथीच्या पुत्रास
अधिरथाने सांभाळले अन्……
सूर्यसुत……सूतपुत्र झाला.

कुंतीपुत्राचे केशकुंतल
राधेने विंचरले अन्……
*कौंतेय* चा *राधेय* झाला *कर्ण*
कर्णानं न कळत घेतलेलं दुसरं दान….. अधिरथाच्या आश्रयाचं.

नंतर……
परशुरामाजवळ लबाडी केली कर्णानं
ब्राह्मण म्हणवून विद्येचं दान घेतलं पदरात पाडून
कळत असतांना घेतलेलं हे पहिलं
अन् आयुष्यातलं तिसरं दान…. कर्णाचं !
पण एके दिवशी सूर्य मावळलाच नाही .
आणि सूर्यपुत्राचे उरूनालेतील
रक्तकणांचे मधुपराग
एक शापित भुंगा उपभोगत राहिला.
निद्रा भंग झाली…एका अवताराची.

यवनसुत कालयवन कालवश झाला योग निद्राभंगाने
तसाच
सूतपुत्र कर्ण शापित झाला…प्राकृत निद्राभंगाने.

परशुरामाच्या शब्दशरांचे शापसूर
भल्याभल्यांच्या कर्णविवरात घुमले असावेत
म्हणूनच एके दिवशी
हस्तिनापुरी राजपुत्रांचे विद्यालंकाराच्या प्रदर्शनाचा
फड जमला असतांना
कर्णानं केलेल्या फडफडाटाचा परिणाम विपरीत झाला
अन्
गुरुंच्या *द्रोण* मुखातून शब्दशर बाहेर पडला
……….. *परिचय* ………
दिलेल्या परिचयाने व शब्दशरांनी विद्ध झालेल्या
सूतपुत्रास दुर्योधनाचे धनिक ( ?) मनाने मलम लावले
दानवीर कर्णाला अंगदेशाच्या नरेशपदाचे दान मिळाले
न मागता…… मित्र म्हणून
कर्णानं घेतलेलं हे चवथं दान…कळत असतांना
इथपर्यंत कर्ण दानवीर नव्हता ( ? )
आणि कर्णानं देखिल पहिलं ( ? ) दान दिलं
आपल्या जळणार्‍या दुर्मनाचं… दुर्योधनास… मित्र म्हणून.

कुटिलतेच्या मैत्रीचं सूर्याइतकं स्वच्छ रुप
सूर्यसुतानं दिलेलं…!

परशुरामावतारी विद्याविभूषित आणि
कवच कुंडलधारी कर्णानं जर याच वेळेस
हस्तिनापुराशी युद्ध केलं असतं तर कुंतीनं तेंव्हांच
*त्याचं* दिलेलं दान ह्याचवेळेस परत घेतलं नसतं का ?

कालयवन , कुंती , कर्ण , कृष्ण आणि काळ
सार्‍यांचीच रास एक
पण ज्या काळानं ह्या सार्‍यांना जन्माला घातलं
तो स्वतःजवळ ह्यांच्या जीवनरथाची दोरी
ठेवेल का नाही ?

विराटाचे गो चौर्याचे वेळेस तर
बृहन्नडेनेच कर्णाचे कानशिलात भडकवली
कर्णासह भीष्मादि वीर नाचत नाचत पळाले

भीष्म , द्रोण इ. रणांगणात असेपर्यंत
युद्धात न उतरणार्‍या मूर्ख सूतपुत्राजवळ
आणि
कवचकुंडले दानात देणार्‍या दानवीराजवळ
राजमाता कुंती गेली
पण…..
योगेश्वर कृष्णाचे जीवावर निसूर झालेल्या
पार्थाच्या जीविताचेदान मागायला नव्हे !

विजयाची *अपेक्षा* बाळगणारा *दानी* कसा असू शकतो?
हा विचार मनात घेवून
ती कर्णास *घरी चल* हा
कानमंत्र द्यायला गेली होती

पण अखेरीस कर्णाचे रथचक्र पृथ्वीने गिळले
आणि
कालचक्राची गती पुन्हा एकदा सिद्ध झाली

अर्जुनाने आकर्ण ओढलेल्या तीराने
कर्णाला आकंठ छेदले होते
कर्णाच्या रक्ताची धार …. वसुंधरेत
अन्………
तेजमहाभूत पृथ्वीमहाभूतात विलीन झालं होतं

मृत्युशय्येवर असतांना
सुवर्णदंत दानात देणार्‍या धीमंत सूर्यपुत्रास
काळाचे अंधाराचा हिशेब जमला नव्हता
त्याला येवढंच कळलं नव्हतं
*रावण* म्हणून जन्माला आलेल्या ब्राह्मण राजाला
काळानं *राक्षस* ठरवलं होतं
तर…..
स्वार्थी मित्रास मदत करणार्‍या दानवीरास
*देव* कोण म्हणेल ?
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*महाभारतातील माणसं*
रचयिता — कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
पिंपळनेर ( धुळे )४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा