कणकवली
तीन वर्षे सात महिन्यांची सेवा स्थगित करून बदलीच्या नवीन जागी हजर होण्यासाठी जाणाऱ्या तत्कालीन कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली मोहन राजमाने यांचा निरोप समारंभ प्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या. आम्ही कणकवलीकर, कणकवली तालुका व्यापारी संघ, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, कणकवली औषध विक्रेता संघटना, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ, जीवनस्त्रोत सेवा संस्था आदी संघटनांच्या वतीने मानाचा फेटा, प.पू.भालचंद्र महाराजांची चांदीची मूर्ती भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सौ.राजमाने यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे सकारात्मक व लोकभिमुख कारभार करता आल्याचे सांगत भावनिक शब्दात ऋण व्यक्त केले.
सौ. राजमाने यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर बदली झाल्याने त्यांना त्या पदावर कणकवलीप्रमाणे सर्व समावेशक व लोकाभिमुख कारभार करावा अशा सदिच्छा उपस्थित कणकवलीकरांनी दिल्या.
सप्टेंबर 2019 मध्ये कणकवली उपविभागीय अधिकारी पदाचा चार्ज हातात घेतल्यावर विधानसभेच्या निवडणुकीचे काम सर्वप्रथम त्यांच्यासमोर होते मतदान केंद्रावर कर्मचारी व साहित्य पाठवण्याच्या पूर्व संध्येला वादळी पावसामुळे झालेल्या न भूतो न भविष्यते परिस्थितीत तेवढ्या समर्थपणे सामोरे जात दुसऱ्या दिवशी निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण करून आपल्या कामाची पद्धत कशी असेल याची चुणूक त्यांनी दाखवून दिली. तदनंतर राष्ट्रीय महामार्ग क्र.66 चा चौपदरीकरणाच्या मोबदला वाटप चे काम सकारात्मक पद्धतीने पदमुक्त होईपर्यंत केले.
निवाडे प्रक्रिया पूर्ण करण्यातही स्वतःहून त्यांनी पुढाकार घेतला आणि कार्यवाही देखील केली. यासोबतच एस एम हायस्कूल समोरील निकृष्ट व धोकादायक कामाबद्दलही त्यांनी त्यांचे काम नसताना आम्ही कणकवलीकरांच्या आग्रही भूमिकेमुळे महामार्ग प्राधिकरण अभियंता संबंधित ठेकेदार तज्ञ अभियंता व नागरिक लाभार्थी यांच्या 10 पेक्षा अधिक बैठका घेऊन महामार्गाचे काम सुरक्षित योग्य चोख व्हावे यासाठी प्रयत्न केले. याच कामाच्यावेळी धोकादायक काम पूर्ण काढून नव्याने करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे त्यांची कारकीर्द देखील यशस्वी झाली असल्याचे गौरवउद्गार यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केले.
कणकवली उपविभागीय अधिकारी कार्यालयात सौ. राजमाने यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळेकर, दीपक बेलवलकर, सिताराम उर्फ दादा कुडतरकर, डॉ.विद्याधर तायशेटे, डॉ. सुहास पावसकर,नितीन पटेल, नंदू उबाळे,रुपेश खाडये,,राजेश राजाध्यक्ष,हेमंत सावंत,संदीप राणे,पंकज दळी,शितल मांजरेकर,व्ही.के.सावंत, आदि कणकवलीकर व विविध संघटनांचे पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.