You are currently viewing “कवी हा समाजातील दुर्बल घटकांच्या वेदनांचा उद्गाता!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

“कवी हा समाजातील दुर्बल घटकांच्या वेदनांचा उद्गाता!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

*”कवी हा समाजातील दुर्बल घटकांच्या वेदनांचा उद्गाता!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे*

पिंपरी

“कवी हा समाजातील दुर्बल घटकांच्या वेदनांचा उद्गाता असतो!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी साधुराम मंगल कार्यालय, पुणे – नाशिक महामार्ग, मोशी येथे शुक्रवार, दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी व्यक्त केले. सेवानिवृत्त वायुसेना अधिकारी नामदेव हुले लिखित ‘वादळ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे, प्रकाशिका शामला पंडित – दीक्षित, कवी नामदेव हुले यांची व्यासपीठावर तसेच ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, अशोक गोरे, कामगारभूषण राजेंद्र वाघ, मुरलीधर दळवी, एकनाथ उगले, अलका हुले यांच्यासह केंद्रीय वायुसेना विभाग आणि साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “कवी नामदेव हुले यांची कविता ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि कबीर कुळाशी साधर्म्य साधणारी आहे. ‘वादळ’ या काव्यसंग्रहातील विषयवैविध्य स्तिमित करणारे आहे. समाजातील विसंगती अन् अनिष्ट प्रवृत्तींवर कवीने मिस्कील शैलीतून टीका केली आहे. त्यामुळे ती वाचकांना अंतर्मुख करते!” पुरुषोत्तम सदाफुले यांनी, “कवी जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा त्याच्याकडून अस्सल कवितेची निर्मिती होते!” असे मत व्यक्त केले. सुरेश कंक यांनी, “कवी नामदेव हुले यांनी फुलपाखराप्रमाणे अनेक विषयांमधून काव्यरूपी मकरंद गोळा केला आहे!” असे गौरवोद्गार काढले. तानाजी एकोंडे यांनी ‘वादळ’ या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य कथन केले. कवी नामदेव हुले यांनी आपल्या मनोगतातून, “शालेय वयातच लेखनाचा प्रारंभ झाला. वायुसेनेतील नोकरीच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर भ्रमण केले; परंतु मायमराठी आणि गावाच्या मातीची नाळ कधीही तुटू दिली नाही!” अशी भावना व्यक्त केली. शामला पंडित – दीक्षित यांनी प्रास्ताविक केले.

अविनाश पिंगळे, सचिन बारसोडे, शुभम नाईक, डॉ. कविता पिंगळे, शशिकांत हुले, गोरक्ष पिंगळे आणि श्री मुक्तदेवी विकास संस्था – पुणे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. नामदेव नाईक यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 11 =