You are currently viewing जॉब मिळालेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमचे समाधान – विशाल परब

जॉब मिळालेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमचे समाधान – विशाल परब

सावंतवाडी :

 

भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून सावंतवाडीत १२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर या रोजगार मेळाव्यात १० हजाराहून अधिक युवक-युवतींना कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती न देता थेट कंपन्यात रोजगार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गोवा, मुंबई, पुण्यातील कंपन्याचा यात समावेश आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिली. यावेळी युवा हब सेंटरचे दिपक पवार, किरण रापणे, नयन गुरव, दिलीप भालेकर, केतन आजगावकर उपस्थित होते.

सावंतवाडी जिमखाना मैदानावर होत असलेल्या जॉब फेअर या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांना व युवतींना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे. यासाठी सुमारे १२० लहान मोठ्या कंपन्या उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे मुलांनी सकाळीच म्हणजे जास्तीत जास्त लवकर उपस्थित रहावे असे आवाहन विशाल परब यांनी केले असून जॉब मिळालेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमचे समाधान असेल असे त्यांनी स्पष्ट केले

दरम्यान, या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्वांना जॉब कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पुढील ६ महिने संबंधितांच्या पात्रतेनुसार असलेल्या जॉबची माहिती त्यांना मोबाईलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून १२ जानेवारीला सावंतवाडी जिमखाना मैदानावर हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला केद्रींय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी तब्बल शंभरहून अधिक कंपन्या हजर राहणार आहेत.

यात टाटा मोटर्स, महिंद्रा, वेलनेस स्टार, आयसीआयसीआय बँक, अशा अनेक कंपन्यांसह पंचतारांकित हॉटेलचा समावेश आहे. दरम्यान यावेळी त्या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ प्लेसमेंट लेटर देण्यात येणार आहे. त्याच बरोबर उर्वरीत लोकांना जॉब कार्ड देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी मधील नोकऱ्या पासून वंचित राहणाऱ्या जास्तीत-जास्त उमेदवारांना रोजगार मिळावा या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत – जास्त उमेदवारांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवावी आणि आपली नोकरी मिळवावी, असे आवाहन अजय गोंदावळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − five =