*मायनाक भंडारी ह्यांच्या कर्तुत्वाला न्याय मिळवून देणार-अध्यक्ष, भंडारी मंडळ भांडुप*
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाने यावर्षीचा विजय दिन भंडारी समाजाचे आद्य पुरुष छत्रपतींचे विश्वासू सहकार अपराजित योद्धा दर्यासारंग मायनाक भंडारी ह्यांनी कर्तृत्व दाखविलेल्या तसेच अलिबाग येथील खांदेरी किल्ला उभारणी केली तेथे साजरा करण्याचे ठरले. त्या अनुषंगाने महासंघाचे रायगड संपर्क प्रमुख सुधाकर पाटील ह्यांनी नियोजन केले. स्वराज्याचे पाहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी ह्यांनी बांधलेल्या किल्ले खंदेरी येथे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक समाजबांधवांन बरोबर खांदेरी किल्याला शनिवार दिनांक १५ एप्रिल २३ रोजी भेट दिली. दरम्यान किल्ल्याची दुरावस्था, तळीरामांमुळे जागोजागी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच तसेच प्रेमी युगुलानी खडकावर चुन्याने केलेली नोंद हे सर्व पाहताना समाज बांधवांचे मन विषण्ण झाले. तसेच मनात प्रचंड खदखद निर्माण होऊन ह्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवली. ह्यात भर म्हणजे मायनाक भंडारी ह्यांनी केलेल्या पराक्रम पुसून टाकण्याचा झालेला प्रयत्न पाहून उपस्थित समाज बांधवांनी संताप व्यक्त केला. रत्नागिरी तालुका माजी अध्यक्ष उपेंद्र शिवलकर ह्यांनी आपल्या समाज महापुरुषांचिंच कशी काय अवहेलना होते हे समजत नाही अशा प्रकारे भावना व्यक्त केल्या. त्यावरून महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर ह्यांनी मायनाक भंडारी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पहिला आणि शेवटचा अपराजित योद्धा असतानाही, इतिहासाच्या पाहुलखुना जर कोणी पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर भंडारी समाज गप्प बसणार नाही ह्याची जाणीव इतिहासाचा विकल्प करणार्यांना दिली. आमचा समाज जेवढा लढवय्या आहे तेवढाच दिलदार आहे. आमच्या अस्मितेचं कर्तृत्व कोणी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांची जागा दाखविली जाईल. आम्हाला इतरांबद्दल आकस नाही पण खोटा इतिहास दाखवून एखाद्याचं कर्तृत्व नाकारू नका.
कित्ते भंडारी ऐक्यावर्धक मंडळ सभागृह, अलिबाग-रायगड येथे सभा पार पडली. सभेमध्ये समाज मान्यवरांनी आपले विचार मांडले. ज्या आरमाराच्या जोरावर इंग्रजांनी अपराजित राहून जगावर राज्य केले, त्या इंग्रजांचा प्रथम पराभव स्वराजाचे पाहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी ह्यांनी केला. इंग्रज, डच व सिद्धी ह्यांच्याशी लढता-लढता हा किल्ला बांधला. त्यासाठी लागणारे बुध्दी चातुर्य त्यांच्याकडे नक्कीच होते. त्या कारणास्तवच छत्रपतींनी त्यांना स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख केले. हा इतिहास अप्पा परब ह्यांच्यासारख्या थोर इतिहासकाराने लिहिला. छत्रपतीँचा पुतळा अरबी समुद्रात उभा रहात आहे. त्यांच्या शेजारी सागरी सामर्थ्य असलेल्या छत्रपतींच्या पहिल्या आरमार प्रमुखाचा पुतळा असावा असा ठराव महासंघाचे कार्याध्यक्ष विनोद चव्हाण ह्यांनी आपल्या परखड विचारासह मांडला त्यास एकमताने मंजुरी मिळाली. सदर ठराव शासनाकडे पाठवावा व त्याचा पाठ पुरावा करावा अशी सूचना महासंघाच्या सौ. शलाका पांजरी ह्यांनी केली.
महासंघाचे रत्नागिरी संपर्क प्रमुख श्री. राजीव कीर ह्यांनी आपले विचार मांडतेवेळी सांगितले की, ह्या अपराजित योध्याला अठरापगड जातीच्या लोकांनी मदत केली तीही विसरण्यासारखी नाही. समुद्र मार्गे अन्न-धान्य, युद्धाचा दारुगोळा व किल्ला बांधणीसाठी लागणारे साहित्य आणणे हे फार जिकिरीचे काम अठरापगड जातीने केले. भंडारी समाज रत्नागिरी येथील रत्नदुर्ग येथे १९ सप्टेंबरला आरमार विजय दिन तथा शौर्य दिन साजरा करीत असते. तो या वर्षीपासून अलिबागच्या खांदेरी किल्ल्यात करावा अशी सूचना केली. बहुद्देशीय भंडारी समाज संघटना अध्यक्ष ह्यांनी माहिती दिली की, त्यांनी त्यांच्या संघटनेच्या वतीने शासकीय इतमामात विजय दिन साजरा करावा. तसेच किल्ल्यावर मायनाक भंडारी ह्याचा पुतळा उभारावा अशी लेखी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.असे निदर्शनास आणले. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतेवेळी महासंघाचे उपाध्यक्ष अनिल नागवेकर ह्यांनी चर्चेदरम्यान सांगितले की आपण किल्ला सफाई हा उपक्रम विजय दिन या दिवशी घेऊया हीच खरी मायनाक भंडारी ह्यांना वाहिलेली आदरांजली असेल. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर ह्यांनी किल्ल्याच्या दुरवस्था व मायनाक भंडारी ह्यांचे नामोनिशाण मिटविण्याचा जो घृणास्पद प्रकार केला गेला त्याबद्द्ल प्रचंड संताप व्यक्त केला. ह्यापुढे आपल्या समाजातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन हा लढा लढायला लागणार असे उपस्थितांचे स्फुलिंग जागविले. आता नाहीतर भविष्यात कधीच संघर्ष उभा राहू शकणार नाही ह्याची जाणीव समाज बांधवांना करून दिली. कित्ते भंडारी ऐक्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष यशवंत शिरसेकर ह्यांनी संघर्षासाठी एकजूट किती महत्वाची आहे ते पटवून सांगितले.
अलिबाग येथील महासंघाच्या निवासी शिबिराची व खांदेरी किल्यावर ये-जा करण्यासाठी लागणारी व्यवस्था ही उद्योजक राजन नार्वेकर ह्यांनी केली. मायनाक भंडारी अपराजित योद्धा चर्चा सत्रात विविध स्थानिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळाने महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. एकंदरीत सभेमध्ये सकारात्मक विचारांचे आदान-प्रदान झाले. सभेचे सूत्र संचलन सौ. सुस्मिता तोडणकर ह्यांनी केले. तर आभार प्रदर्शन जैतापूर एज्युकेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश आडविरकर ह्यांनी केले.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-