सावंतवाडी
येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेतील कु. देवाशिष विलास फाले व कु.श्रीकर मंदार शुक्ल (इयत्ता- दुसरी)यांनी घवघवीत यश मिळवून सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग या स्पर्धा परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा नंतरची ही स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेतली जाते. कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी परंपरेनुसार यावर्षीही गुणवत्ता यादी मध्ये येण्याचा मान मिळवला. यावेळी कुमार देवाशिष फाले आणि श्रीकर शुक्ल याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. शैलेश पै, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर इतर सर्व संस्था पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत व इतर सर्व शिक्षकांनी कौतुक केले. शाळेमधून इयत्ता दुसरी ते चौथी मध्ये प्रविष्ट झालेल्या यशस्वी विद्यार्थी व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे कौतुक यावेळी करण्यात आले. शाळेच्या सर्व या विद्यार्थ्यांना श्री. प्रदीप सावंत, अमित कांबळे,श्री डी.जी वरक, प्राची बिले, स्वरा राऊळ, संजना आडेलकर यांनी मार्गदर्शन केले.