You are currently viewing उत्साव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेणे आवश्यक – दत्तात्रय भडकवाड

उत्साव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेणे आवश्यक – दत्तात्रय भडकवाड

उत्साव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेणे आवश्यक – दत्तात्रय भडकवाड

सिंधुदुर्गनगरी

यावर्षी दि. 2 ते 6 नोव्हेंबर 2021 दरम्यान दिपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी  उत्सव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे.

            दिवाळीच्या अनुषंगाने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे. यासूचना पुढील प्रमाणे आहेत. कोविड – 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने दि. 4 जुन 2021, 11 ऑगस्ट 2021 तसेच 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शन सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे खुली करण्यात आली असली तरी दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी. दिपावली उत्सवा दरम्यान कपडे, फटाके, दाददागिने व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्तावर गर्दी होत असते. तथापि, नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग / संक्रमण वाढणार नाही. दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे वितरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचे त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा. कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करताना 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इ. माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाने दि. 23 ऑक्टोबर 2018 व 23 जुलै 2021 रोजी दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. कोविड – 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच यानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + thirteen =