You are currently viewing संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी जयप्रकाश भगत

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी जयप्रकाश भगत

इचलकरंजी: प्रतिनिधी

इचलकरंजी (शहर )तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती नुकतीच घोषित करण्यात आली.या समितीमध्ये
तारदाळ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयप्रकाश नामदेव भगत यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

इचलकरंजी इचलकरंजी (शहर )तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती नुकतीच घोषित करण्यात आली.यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांची निवड करण्यात आली.तसेच अन्य सदस्यांची निवड करण्यात आली.यामध्ये सदस्यपदी
तारदाळ येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी असलेले जयप्रकाश नामदेव भगत यांची निवड करण्यात आली.जयप्रकाश भगत
हे सामाजिक, सहकार, धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून अनेकांना विविध माध्यमातून मदत करण्यासाठी प्रयत्नशील असतात.याशिवाय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून देखील त्यांनी गावातील अनेक तंटे सामोपचाराने मिटवून सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.याशिवाय ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द चांगला लोकप्रतिनिधी म्हणून गाजली आहे.
सध्या ते नामदेवराव भगत दत्त सहकारी दूध संस्थेवर चेअरमन , विकास सेवा सोसायटी – १ वर संचालक आणि राजर्षी शाहू पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन म्हणून कार्यरत राहून या माध्यमातून समाज विकासात योगदान देत आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची इचलकरंजी (शहर ) तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.या निवडीसाठी त्यांना खासदार धैर्यशील माने, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हाळवणकर , शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने
यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या निवडीनंतर नूतन सदस्य जयप्रकाश भगत यांनी मला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून गरीब , गरजूंना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्याचा सातत्याने प्रामाणिक प्रयत्न राहिल ,अशी ग्वाही दिली.
या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा