श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा सहाय्यक राजेंद्र देसाई सेवानिवृत्त
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी च्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा सहाय्यक राजेंद्र देसाई हे आपल्या नियत वयोमानुसार वयाच्या 58 व्या वर्षी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले .
संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत
खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ.शुभदादेवी
खेमसावंत भोंसले, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल.भारमल, वनस्पतीशास्त्र
विभागप्रमुख डॉ. यु.एल.देठे, प्रा. एम ए ठाकूर, सौ.देसाई तसेच महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि.एल. भारमल यांनी केले . ते म्हणाले राजेंद्र देसाई हे सालस ,शांत ,प्रामाणिक व मितभाषी असुन भौतीकशास्त्र विभागामध्ये 1990 मध्ये रुजू झाले व 2019 ते 2025 पर्यंत प्रयोगशाळा सह्हाय्यक म्हणुन वनस्पतीशास्त्र विभागात त्यांनी काम केले. प्रा.यु.एल. देठे म्हणाले की राजेंद्र देसाई हे अत्यंत प्रामाणिक ,शांत ,संयमी स्वभावाचे आहेत .त्यांनी एकूण 36 वर्षे महाविद्यालयामध्ये सेवा केली. भौतीकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगेश चौधरी, वनस्पतीशास्त्र विभागाचे ,डॉ. उमेश पवार , अर्थशास्त्र विभागाचे प्रा. टी व्ही कांबळे, कार्यालयातील सौ आरती पेडणेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली . सत्कारास उत्तर देताना राजेंद्र देसाई यांनी राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले, राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले, तसेच विद्यमान
राजेसाहेब श्रीमंत
खेमसावंत भोंसले , राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले या सर्वांचे आभार मानले व आपण प्रामाणिकपणे काॅलेजसाठी काम केले व सर्वानी आपल्याला सांभाळुन घेतले त्यामुळेच काम करणे सोपे गेले असे ते म्हणाले.
राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी राजेंद्र देसाई यांच्या प्रामाणिक कामाचे कौतुक केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.