You are currently viewing तुळस गावातील जल जीवन कामांत झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

तुळस गावातील जल जीवन कामांत झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

राधाकृष्ण गोलतकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

ओरोस

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. अन्यथा कुटुंबासह १ मे रोजी ग्रामस्थ उपोषण छेडतील, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थ राधाकृष्ण दशरथ गोलतकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना गोलतकर यांनी दिलेल्या निवेदनात, यापूर्वी गावात जल स्वराज्य अभियानामध्ये एक कोटी ३९ लाख रुपये खर्च करून योजना राबविण्यात आली होती. तरीही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. या योजनेत अधिकारी व पुढारी यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केला होता. त्याच प्रमाणे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांत सुरू आहे. विहिरीचे काम मशिनद्वारे खोदाई करून सुरू आहे. खरीवाडी येथील खोदलेल्या विहिरीत एक फूट सुद्धा पाणी नाही. तरीही विहिरीचे बांधकाम करीत निधीचा गैरव्यवहार ठेकेदार व गावातील पुढारी यांनी केला आहे. याबाबत वेंगुर्ले दिवाणी न्यायालयात ६ एप्रिल रोजी दावा दाखल केला आहे.
त्यामुळे या पत्राची दखल घेण्यात यावी. अन्यथा १ मे रोजी ग्रामस्थ कुटुंबासह अधिकाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषण करणार आहोत, असे गोलतकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा