You are currently viewing प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतर्गंत लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत….

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतर्गंत लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत….

 – सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) ना.वि.भादुले

सिंधुदुर्गनगरी 

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतर्गंत जिल्ह्यात सन 2020 ते 2025 या कालावधीत विविध योजना राबविण्यात येणार आहे. या योजनांतर्गत 40 ते 60 टक्के अनुदान असणार आहे. सन 2020-2021 या वर्षामध्ये सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी  अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) मालवण, सिंधुदुर्ग  ना.वि. भादुले यांनी केले आहे.

            देशातील मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ व्हावी व देशातील मच्छिमारांच्या हितसंवर्धनासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना घोषीत केली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन 2020 ते 2025 या वर्षामध्ये मच्छीमारांसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतर्गंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महीला यांना 60 टक्के अनुदान व सर्वधारण यांना 40 टक्के अनुदान असणार आहे.

            प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय मालवण- सिंधुदुर्ग कार्यालयातील श्री. ना.वि.भादुले, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग संपर्क क्र. 9423542954, श्रीमती तेजस्विता करंगुटकर, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग संपर्क क्र. 8411843537 व श्री. वि.जी. देवकर, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग संपर्क क्र. 8308336146  यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ना.वि.भादुले, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) सिंधुदुर्ग -मालवण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =