कुडाळ
बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अकरा दिव्यांग मुले व मुली ५३६ किलोमीटरचा मुंबई ते गोवा असा पायी प्रवास करत आहेत.
‘कॅच द रेन’ म्हणजेच पाणी आडवा पाणी वाचवा हा संदेश येऊन हे दिव्यांग बांधव मुंबई ते गोवा असा पायी प्रवास करत आहेत. तसेच ॲथलेटिक्स मध्ये दिव्यांग बांधवांना सरकारमार्फत जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात याकरता हे दिव्यांग बांधव माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. काल रात्री सदर दिव्यांग बांधव कुडाळ येथे पोहोचले असता त्यांच्या निवास भोजन व अन्य सर्व व्यवस्था भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने करण्यात आली. तसेच आज सकाळी बांदाच्या दिशेने निघत असताना भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा चिटणीस अनिल उर्फ बंड्या सावंत, नगरसेवक राजीव कुडाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील पदयात्रे करता शुभेच्छा दिल्या.