*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम पत्रलेखन*
आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
यांना सादर प्रणाम …
खरं सांगायचं तर आपला केवळ नामोच्चार, तर कधी आपले छायाचित्र, अथवा आपला उंच उभारलेला ताठ मानेचा, हाती पुस्तक असलेला, सुटधारी असा पुतळा पाहिला तरी मन अभिमानाने भरून येते. हाच खरा देशाचा सुपुत्र! खरा शिल्पकार! घटनाकार आणि राष्ट्राचा अभिमान! हे उद्गार सहजपणे येतात.
सामाजिक विषमतेसाठी झटणारा, शिक्षणाची सुयोग्य धोरणे राबवणारा, कृषीविषयक कायद्यांची सुसह्य आखणी करणारा, महिलांच्या सक्षमतेसाठी, उन्नतीसाठी त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी उदार दृष्टिकोन ठेवणारा असा एक महान लोकनेता आपण आहात. मी आपणास मनोभावे वंदन करते.
कालच आपल्या जयंतीचे बहारदार सोहळे देशभर साजरे झाले. निळ्या काठांची पांढरीशुभ्र साडी नेसलेल्या महिला, गळ्यात निळा मफलर असलेले पुरुष आणि खांद्यावर निळा झेंडा घेत “जय भीम” चा जयघोष करत अभिवादनाला जाणारे युवक शहराच्या प्रत्येक रस्त्यांवर दिसत होते. आपल्या जयंती निमित्त चौकाचौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अनेक पुरस्कारांचे यानिमीत्ताने आदान प्रदान झाले. समाज कल्याण विभागाकडून पाली भवनाच्या बांधकामासाठी येणाऱ्या खर्चावर शिक्कामोर्तब झाले. संविधानाच्या एक लाख प्रतीचे मोफत वाटप झाले. आणि असे बरेच काही आपल्या जयंतीनिमित्त झाले.
“आपल्यासारख्या प्रवाहा विरुद्ध जाऊन भूमिका घेणारे म्हणून आपली वैचारिक ज्ञानसत्ता बदलत्या काळात आत्मसात करणे गरजेचे आहे.” अशा प्रकारची आवेश पूर्ण, कळकळीची भाषणे व्यासपीठावर रंगली. हे सारं काही छानच आहे. रचनात्मकच आहे. आपल्या थोर नायकाला स्मृतीसुमने वाहण्याची ही सामाजिक प्रथा स्तुत्य आणि आवश्यक आहेच.
भारतीय हे मुळातच व्यक्तिपूजक आहेत. उत्सव प्रिय ही आहेत. धार्मिक सण ते जितक्या प्रफुल्लीतपणे साजरे करतील त्याच भावनेने ते राष्ट्रपुरुषांच्या जयंत्याही साजर्या करतात. आणि ते करत असताना सार्वजनिक स्तरांवर होत असलेली स्पर्धात्मक चुरस ही सुद्धा अत्यंत मनोरंजक असते. ते एक वेगळंच राजकारण असतं.ते जाउच दे!
पण माननीय बाबासाहेब, हे सगळं आजूबाजूला घडत असताना, पाहत असताना माझ्या मनात असा विचार येतो की, ज्या प्रचंड जनसमुदायाने सोहळ्यात भाग घेतला त्यांच्या अंतःकरणात तुमची उदात्त, क्रांतीकारी, एक मुक्त विचारी, सक्षम, निर्भय नागरिकाविषयीची विचारधारा किती अंशाने आणि किती खऱ्या अर्थाने टिकून आहे? हे वैचारिक आरक्षण किती मने आजही सांभाळून आहेत? कित्येकांच्या घरात आज आपली देवासमान पूजा होते. ते अयोग्य अथवा गैर नाही. पण हार तुरे घालून, आरत्या म्हणून केवळ तुमची तत्वं पाळली जात आहेत का किंवा जातील का? ज्या सामाजिक विषमतेसाठी आपण झगडलात, यशस्वी झालात, मुक्ततेची वाट देऊही शकलात पण गटबाजी संपली का? या ना त्यानिमित्ताने ती वेगवेगळी रूपे घेऊन समाजात आहेतच. आणि त्यामुळे आजही दंगली आहेत, अराजकता आहे, अशांती आहेच. मला वाटतं बाबासाहेब आम्ही अजूनही खूप अपुरेच आहोत. भेदाभेदांच्या भिंती आम्ही खरंच का दूर केल्या? नाही उत्तर. हे उत्तर देण्यासाठी तुम्हीच या पृथ्वीतलावर पुन्हा जन्म घ्यायला हवा.
जय भीम!
एक भारतीय…
(राधिका भांडारकर)
*संवाद मिडिया*
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————