You are currently viewing श्री यल्लम्मा देवी (कर्नाटक )

श्री यल्लम्मा देवी (कर्नाटक )

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

श्री यल्लम्मा देवी (कर्नाटक )
यलम्मा देवी म्हणजेच महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रेणुका देवी होय. रेणुका देवींची पूजा दक्षिणेत विविध प्रकारच्या नावाने केली जाते. यलम्मा देवीचा एक हात अहंकाराचा नाशिक करणारा, तर दुसरा हात भक्तांवर वरदहस्त ठेवणारा आहें. दक्षिणेत यां देवीला महाकाली, जोगम्मा, सोमलम्मा, पोचम्मा, गुंडूम्मा, मायसम्मा, जगदंबिका, होलीयम्मा, मारिअम्मा अशा विविध नावानी ओळखली जाते. यां देवीचे मंदिर कर्नाटकात बेळगावी जिल्ह्यात सवदात्ती यां गावात यळम्मागुंडा यां टेकडीवर आहें. मार्गशिर्ष पौर्णिमेच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. हजारो भाविक येथे येतात.
यलम्मा देवी हीच रेणुका देवी असल्याने तिची जन्म कथा म्हणजे यलम्माची जन्म कथा आहें. यलम्मा रोज पहाटे उठून मलप्रभा नदीवर जाई तिथल्या वाळूकामय मातीचे मडके बनवत असे व त्यात पाणी भरून आणत असे.त्या पाण्याने जमद्गणी ऋषीं आपले धार्मिक कर्म करीत असत. एकदा यळम्मा पाणी आणायला नदीवर गेली तेव्हा तिने पहिले काही गंधर्व युगुल जलक्रीडा करत आहें. ते पाहून ती स्वप्न रंगवू लागली. की पती बरोबर आपणही जलक्रीडा करावी. थोड्या वेळाने ती भानावर आली तिला खूप उशीर झाला होता. तिचे लक्ष नसल्याने तिच्या कडून मडके तयार झाले नाही. ती निराश होऊन आश्रमात परत आली. ती रिकाम्या हाताने परत आली म्हणून जमद्गणी ना खुप राग आला. त्यांनी तिला दूर निघून जाण्यास सांगी तले. ती दूर जंगलात गेली आणि तिथे तप करू लागली. तिथे तिला संत एकनाथ आणि संत जोगीनाथ भेटले ती त्यांना घडलेला प्रकार सांगितला. तिने त्यांना जमाद्गणी यांचा राग कमी होण्यासाठी उपाय विचारला.तेव्हा संत एकनाथनी तिला जवळच्या तळ्यात स्नान करावयास सांगितले आणि स्नान केल्या नंतर जवळपास च्या खेड्यातून जोगवा मागण्यास सांगितला. जोगव्यात मिळालेले तांदूळ, त्यातील अर्धे तांदूळ संतांना दं करणे आणि अर्धे तांदूळ त्यात गूळ घालून प्रसाद करावयास सांगितले. असे तीन दिवस व्रत करण्यास सांगितले. त्या प्रमाणे देवीने ते केले मग तिने संत एकनाथना सांगितले ते म्हणाले. तू आता परत जा तुझी पूजा भविष्य काळात लोक करतील. तू अमरत्व पावशील. पण यां पुढचा काल तुझ्या साठी खूप कठीण आहें. यलम्मा आश्रमात परत आली. परंतु जमद्गणी ऋषींचा राग अद्याप कमी झालेला नव्हता. यलाम्मा आणि जमजेनींना पाच पुत्र होते. त्या पैकी चार पुत्र वसू, विश्वावसू, रूमणवत, सुशेण आश्रमात होते. त्यांना जमदगनी नी aaila शिक्षा देण्यास सांगितले पण त्या मुलांनी आईला शिक्षा देण्यास नकल दिला. त्याच वेळी त्यांनी आपल्या चारही पुत्राना भस्मसात केले.यलम्मा रडू लागली तेवढ्यात पाचवे पुत्र परशुराम तेथे आले.त्यांना सर्व घडलेला प्रकार समजला. परशुरामास जमदगणींनी परशुरामास आज्ञा केली तुझ्या आईचा शिरच्छेद कर तेव्हा परशुरामा नी आईचा शिरच्छेद केला. जमदगणी प्रसन्न झाले त्यांनी परशुरामास दोन वर मागण्यास सांगितले. परशुरामानी दोन वर मागितले. पहिला वर म्हणजे आईला म्हणजे यलम्मा देवी आणि चारही भावांना जिवंत करण्यास सांगितले. दुसरावर म्हणजे जमद्गणी ना त्यांचा राग कायमचा विसरून जा असे सांगितले. अशारीतीने देवी यलम्मा परत जिवंत झाली. परंतु यलम्मा देवीच्या धडास एका दलित स्त्री चे लावले गेले. तरी सुद्धा तिचा स्वीकार जमदगणी ऋषींनी केला. त्यामुळे ही देवी दलितांची देवी मानली जाते. अनेक दलित कुटुंबाची ती कुलदेवता आहें.
यलम्मा देवीचेच एकविरा देवी हे एक रूप आहें. मार्गशीर्ष पौर्णिमेला सवदात्तीला मोठी जत्रा भरते. हजारो लोक येथे येतात.
यलम्मा देवी मंत्र…..
ॐ ह्रिम क्रऔम ऐम l
कल्पना तेंडुलकर
ओरोस

प्रतिक्रिया व्यक्त करा