You are currently viewing बालपणीचा हरवलेला आनंद

बालपणीचा हरवलेला आनंद

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा यांचा अप्रतिम लेख

जग प्रगतीच्या मार्गावर भरधाव वेगाने धावत आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडतंय आणि भलतच ऐकायला सुद्धा मिळतंय. स्पर्धा, परीक्षा, सरकारी नोकरी, मोठमोठे बंगले, चारचाकी गाडी आणि किमान 6 अंकी पगार. हेच जीवनाचे धेय्य बनवले आहे आजच्या नवीन पिढीचे. यासाठी घरातील सर्व मंडळी जणुकाही हात धुवून मागे लागतात. बाळ जन्माला आले की लगेच तो काय होणार किंवा काय करायचे हे भाकीत केल्या जाते. मग येथून सुरू होतो त्याचा प्रवास. दोन वर्षाचा झाला की सगळ्यात आधुनिक शाळेत त्याला प्रवेश मिळावा म्हणून खटपटी सुरू होतात आईवडीलांच्या. त्या कवळ्या फुलाला कळीतून फुलात जायच्या अगोदर आपले जबरदस्तीचे नियम लादले जातात. त्याला खेळायच्या भागडायच्या वयात अभ्यास करायचा दबाव आणला जातो. इथे जाऊ नको, हे करू नको, रिकाम्या पोरांसोबत फिरायचे नाही. बाहेर पडायचे नाही अशा अनेक गोष्टी त्याला याच्या मर्जीविरुद्ध कराव्या लागतात. आणि एकदा का त्याच्या हाती पुस्तक आले की मग घरून शाळा, शाळेतून घरी आल्यावर पुन्हा ट्युशन, ट्युशन झाले की शाळेतील अभ्यास. अभ्यास झाला की सराव अशा कितीतरी न पेलता येणाऱ्या जबाबदाऱ्या. यामुळे त्याच्या मनात उदासीनता कायमस्वरूपी घर करून राहते.

आणि मग अशा वातावरणात वाढलेल्या त्या बाळाच्या जीवनात आनंदाचे क्षण कायमचे लुप्त होऊन जातात. तो एका उदानसीनतेच्या गर्तेत पडतो तो जोपर्यंत जो काही आईवडिलांच्या मनाप्रमाणे करत नाही. अभ्यासाची प्रक्रिया एकदा सुरू झाली की वयाच्या अंदाजे जरी म्हटले तरी २५ ते ३० वर्षापर्यंत.यामध्ये सहाजिक आहे की प्रत्येक जण यशस्वी होऊ शकत नाही. आणि जर यशस्वी झाला नाही तर पुढील सगळे आयुष्य फक्त टोमणे ऐकत राहणे घरच्यांचे यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसतो. याउलट जर कदाचित यशस्वी झाला नाही तर त्याला पाठिंबा द्या आणि पुन्हा उठून उभे करा. पहा तुमची एक आपुलकीची थाप त्याला प्रचंड बळ देईल आणि तो पुन्हा जोमाने त्याच्या ध्येयाकडे वाटचाल करेल.

आपण आपल्या मुलांना कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला का? खूप मुलं आपल्या मनातील भावना किंवा मनाची गुदमद घरात कधी व्यक्त करतच नाही कारण तुमचा नकार त्याला न सांगायला भाग पाडतो. भरपूर मुले समजदार असतात ते परिस्थिती लक्षात घेऊन काम करतात पण खूप जास्त मुले घरच्या मंडळींसोबत खरं सांगायचं टाळतात. आपल्या मुलांच्या मनात आपल्या बद्दल इतके भक्कम बळ तयार करा की त्याला विश्वास पाहिजे की आपल्या घरातील सगळे जण आपल्या निर्णयाला पाठिंबा देतील म्हणून. आपण आपल्या परी बरोबर आहे पण निर्णय त्यांना घेऊ द्या. मुलांना लहानपणी मनसोक्त आनंद लुटू द्या कारण पुन्हा वेळ नसतो त्या निरागस सुखासाठी. त्याला परिपक्व होण्यासाठी लहानपणी ओझे लादून देऊ नका काही वेळ जाऊ द्या वाढत्या वयात तो आपल्या जबाबदाऱ्या निःसंकोचपणे पार पडेल. प्रत्येक आईवडील हे मार्गदर्शक असतात पण कधीकधी स्वार्थासाठी माणूस चुकू सुद्धा शकतो.पण त्यासाठी त्याच्या लहानपणाचा आनंद हिरावून घेऊ नका यानाही स्वार्थासाठी त्याचा बळी सुद्धा.

रामदास आण्णा
7987786373

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =