You are currently viewing तारकर्लीच्या समुद्रात मासेमारी नौका अर्धवट स्थितीत बुडाली…

तारकर्लीच्या समुद्रात मासेमारी नौका अर्धवट स्थितीत बुडाली…

मालवण

मासेमारी नौकेचे फायबर फाटल्याने समुद्राचे पाणी आत घुसल्याने शहरातील मेढा येथील रवी खांदारे यांच्या मालकीची सिद्ध प्रसाद ही नौका तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात अर्धवट स्थितीत बुडाल्याची घटना आज सायंकाळी घडली. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी दुसऱ्या नौकेने धाव घेत तांडेल, खलाशी तसेच माल सुखरूप किनाऱ्यावर आणला. रात्री उशिरापर्यंत ही नौका बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

याबाबतची माहिती अशी- रवी खांदारे यांच्या मालकीची सिद्धप्रसाद ही मासेमारी नौका दोन दिवसांपूर्वी मासेमारीस गेली होती. आज सायंकाळच्या सुमारास नौकेचा फायबर फाटल्याने समुद्राचे पाणी नौकेत घुसले. हा प्रकार तांडेलाच्या लक्षात येताच त्याने नौका किनाऱ्याच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात ही नौका अर्धवट स्थितीत बुडाली. हा प्रकार स्थानिक मच्छीमारांच्या निदर्शनास येताच त्यांनी पात घेत घटनास्थळी धाव घेत नौकेवरील तांडेल, खलाशी यांना सुखरूप बाहेर काढले. नौकेवरील सर्व मासळी किनाऱ्यावर आणण्यात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत नौका बाहेर काढण्यासाठी मच्छीमारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

 

*संवाद मिडिया*
*Web link*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा