You are currently viewing राज्यशासना विरोधात नवरात्रोत्सवानंतर भाजप उतरणार रस्त्यावर :राजन तेली….

राज्यशासना विरोधात नवरात्रोत्सवानंतर भाजप उतरणार रस्त्यावर :राजन तेली….

शासनाकडून केवळ घोषणा : सरकार विरोधात जनतेत तीव्र असंतोष….

सावंतवाडी :

राज्य शासनाचा गेल्या काही दिवसात सावळा गोंधळ सुरु आहे. लोकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे.महिला सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण असलेल्या उमेदसारख्या केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. या विरोधात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या पाच हजारांच्या मोर्चावेळी पालकमंत्र्यांनी शंभर कोटी देण्याची घोषणा केली. मात्र ही महिलांची फसवणूक आहे. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असताना एवढे पैसे देणार कुठून असा सवाल करतानाच आजवर शासनाकडून केवळ घोषणाच होत आहेत. मात्र, सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. त्यामुळे जनतेत असलेल्या या सरकार विरोधी असंतोषाच्या विरोधात नवरात्रोत्सवानंतर भाजप आक्रमकपणे रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला.

सावंतवाडी येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, तालुका सरचिटणीस प्रमोद गावडे, मधुकर देसाई, माजी सभापती रवि मडगांवकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =