You are currently viewing अखंड महाराष्ट्र भरातून बेस्ट सेवेसाठी गेलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरी घोर निराशा

अखंड महाराष्ट्र भरातून बेस्ट सेवेसाठी गेलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरी घोर निराशा

बनी नाडकर्णी यांनी थेट मुबंई च्या गोरेगाव येथे जाऊन केलं स्ट्रिंग ऑपरेशन

मुंबई
दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 200 एस टी कर्मचाऱ्यांना बेस्ट च्या सेवेसाठी मुंबई गोरेगाव येथे एसटी प्रशासनाच्या आदेशाने बोलावण्यात आले होते.

त्या एसटी कर्मचा-यांचे हाल दैनिय होत असल्याचे कानी पडताच महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे उपाध्यक्ष J.D उर्फ बनी नाडकर्णी यांनी मुंबई गोरेगाव येथे धाव घेतली. तिथे गेल्यावर एसटी कर्मचा-यांना थ्रीस्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी रुमची व चांगल्या प्रतीच्या जेवणाची सोय केली असल्याचं खोटं आमिष दाखवून एसटी कर्मचा-यांच्या हातावर 4000 हजार रुपये ठेउन त्यांची निव्वळ फसवणूक एसटी प्रशासनाने केली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. अक्षरशः कोविड रुग्णांना वापरण्यात आलेले हॉटेल आणि अळी असलेलं जेवण त्यांना देण्यात आलं.

यातुन एसटी कर्मचा-यांनी आवाज उठवला असता आता त्यांची गोरेगाव डेपोत अडगळीच्या जागेत निकृष्ठ दर्जाच्या जेवनाची व्यवस्था व हॉटेलमध्ये दोघांच्या रुममध्ये चार- पाच कर्मचा-यांची झोपण्याची व्यवस्था एसटी प्रशासनाने केली असल्याचं श्री नाडकर्णी यांनी मीडियाशी बोलताना सांगितल. त्यांना कोणतेही पीपीई कीट नाही, सुस्थितीत नसलेल्या गाडया त्यांना देउन त्यांच्या जीवांशी सरकार खेळत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. जेवणाची पडताळणी करत तात्काळ त्यांनी जेवण बदलायला सांगितले.

गेली अनेक दिवस हालअपेष्टा सहन करून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या एस टी कामगारांना न्याय मिळविसाठी बनी नाडकर्णी यांनी थेट मुंबई मध्ये जाऊन भेट देऊन पडताळणी केली. त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न नाडकर्णी यांनी केला. जीवाची पर्वा न करता अविरत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी यावेळी आपाल्या व्यथा नाडकर्णी यांना सांगितल्या.

कामगारांची गैरसोय होत असल्याने कामगारांची मानसिकता इथे रहाण्याची नसल्याचं सांगत आम्हला ‘झाल तरी आम्ही राजीनामा देतो पण आम्हाला घरी सोडा” असे सर्व कर्मचारी आपल्याला सांगत असल्याचं बनी नाडकर्णी यांनी मीडियाशी बोलताना सांगितल.

यावेळी जर या कर्मचा-यांच्या जीवाला काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना गप्प बसणार नाही असे श्री नाडकर्णी यांनी प्रशासनला सक्त ताकिद दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =