You are currently viewing शेतातून टाकण्यात आलेली 33 के.व्ही. लाईन बदला…..

शेतातून टाकण्यात आलेली 33 के.व्ही. लाईन बदला…..

वीज वितरण कार्यालयासमोर उंबर्डे ग्रामस्थांचे उपोषण सुरूच.

वैभववाडी
शेतीतून जबरदस्तीने टाकण्यात आलेली वीज वितरणची 33 के.व्ही. लाईन त्वरित काढा. याबाबतचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. असा आक्रमक पवित्रा उंबर्डे वासियांनी घेतला आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण सुरू होते. 2016 पासून उंबर्डे वासियांची ही मागणी आहे. परंतु अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या लाईन बाबत अनेक अडचणी असताना लाईनच्या उद्घाटनासाठी आलेल्या खासदार राऊत यांच्यासोबत फोटो काढणा-या अधीक्षक अभियंत्यांना उपोषणस्थळी हजर करा. अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व सरपंच एस.एम. बोबडे यांनी व्यक्त केली.

जुलैमध्ये कार्यकारी अभियंता पाटील, उपअभियंता कथले, श्रीमती इंदलकर यांनी या 33 केव्ही लाईनची प्रत्यक्ष पाहणी केली होती. दरम्यान रस्त्याच्या कडेने केवळ अडीज किमी अंतर असताना पाच किमी लाईन फिरवत शेतातून नेण्याचे कारण काय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. पाटील यांनी भूमिगत लाईन टाकण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यांचे आश्वासन हवेत विरले आहे. त्यांनी ग्रामस्थांची शुद्ध फसवणूक केल्याचा आरोप सरपंच बोबडे यांनी केला. कोरोनात 144 लावलात तरी बेहत्तर पण उपोषण सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा उंबर्डे वासीयांनी घेतला आहे. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, धर्मरक्षीत जाधव, रज्जब रमदुल, उमर रमदुल, सदानंद दळवी, उदय मुद्रस, डॉक्टर खाडे, अलीबा बोथरे, दशरथ दळवी, वैभवी दळवी, जुलेखा सारंग, जायदा नाचरे, श्रावणी खाडे, शुभांगी पवार, अब्दुल नाचरे, कादीर नाचरे, खुदबू पखाली, श्रीकांत शिरसाट, तेजस पाटील, मंगेश कदम, विशाल कदम, सुनील कदम, मोहम्मदहनिफ रमदुल व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता श्री मोहिते, उपकार्यकारी अभियंता श्री सूर्यवंशी, शाखा अभियंता थोरबोले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा