You are currently viewing ‘राळेगणसिद्धीत जाऊन अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार’; उघड धमकीनं  एकच खळबळ

‘राळेगणसिद्धीत जाऊन अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार’; उघड धमकीनं  एकच खळबळ

‘राळेगणसिद्धीत जाऊन अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार’; उघड धमकीनं  एकच खळबळ

संपूर्ण देशभरात उपोषण आणि आंदोलनामुळे प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची १ मे रोजी हत्या करणार अशी धमकी एका व्यक्तीने दिली आहे.

इतक्या उघडपणे दिलेल्या या धमकीने राज्यात एकच खळबळ माजली आहे. शेतीच्या वादातून खोट्या केसेस दाखल झाल्यानं कुटुंब दहशतीखाली जगत आहे. समाजसेवक अण्णा हजारेंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री यांना अनेकवेळा निवेदन दिल्यानंतरही काहीच होत नसल्याने संतोष गायधने या व्यक्तीने हजारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात संतोष गायधने यांची शेत जमीन आहे. गेल्या अनेक काही वर्षांपासून शेती वादातून गायधने यांच्या कुटुंबावर अन्याय होत असल्याची भावना आहे. अण्णा हजारेंसह प्रशासनाला निवेदन देऊनही त्यांच्या पदरी निराशा लागली आहे. त्यातूनच संतप्त भावनेने संतोष गायधने यांनी १ मे रोजी अण्णा हजारेंचीच हत्या करणार असा इशारा दिला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव गावात संतोष गायधने यांची शेतजमीन आहे. या शेतीच्या वादातून ९६ जणांनी मिळून गायधने कुटुंबावर दबाव आणला आहे. त्यांच्यावर विविध मार्गाने खोट्या केसेस दाखल करून कुटुंबाचा मानसिक छळ सुरू आहे. त्यामुळे कुटुंब तणावात आणि दहशतीखाली जगत आहे. शेती वाद आणि खोट्या केसेस या भीतीने आता गायधने कुटुंबाने अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे.

राज्याचे मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अण्णा हजारे यांना निवेदन देऊनसुद्धा या प्रकरणी काहीच कारवाई होत नसल्याने गायधने कुटुंब संतप्त झाले आहे. त्यातूनच या कुटुंबाने राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी देखील मागितली आहे.तसेच १ मे रोजी अण्णा हजारेंची राळेगणसिद्धीत जाऊन हत्या करणार असा इशारा संतोष गायधने याने दिला आहे. दरम्यान अण्णा हजारेंना दिलेल्या हत्येच्या धमकीने प्रशासनात जोरदार खळबळ माजली आहे. आता अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी अण्णा हजारे समर्थकांना केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − thirteen =