You are currently viewing DTSE राज्यस्तरीय परीक्षेत विद्यामंदिर इंग्लिश मिडीअम स्कूलची चमक

DTSE राज्यस्तरीय परीक्षेत विद्यामंदिर इंग्लिश मिडीअम स्कूलची चमक

दोन विद्यार्थ्यांची ISRO अंतराळ प्रदर्शन भेटीसाठी निवड

कणकवली :

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचा शैक्षणिक पाया अधिक भक्कम व्हावा तसेच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळावी या उद्देशाने विद्यामंदिर इंग्लिश मिडीअम स्कूल, कणकवली येथे नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात येते.

याच उपक्रमांतर्गत Diamond Talent Search Examination (DTSE) मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ISRO अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षेत विद्यामंदिर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीतील कु. गौरेश नागेश तेली आणि इयत्ता तिसरीतील कु. तनिष अमोल गाडी यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आयोजित अंतराळ प्रदर्शन भेटीसाठी निवड झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. श्री. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक श्री. वणवे सर, विद्यामंदिर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. दिव्या सावंत मॅडम, पर्यवेक्षिका सौ. श्रुती बावकर मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विज्ञान व संशोधन क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना प्रेरित करणारी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा