You are currently viewing ज्येष्ठांचा सन्मान सोहळा हा कुटुंब व्यवस्थेसाठी आदर्श : रा. पा. जोशी..

ज्येष्ठांचा सन्मान सोहळा हा कुटुंब व्यवस्थेसाठी आदर्श : रा. पा. जोशी..

तुळस येथे ७५ वर्षे पूर्ण केकेल्या ग्रामस्थांचा सन्मान सोहळा संपन्न

वेंगुर्ले

वेंगुर्ले- तुळस मधील ज्या नागरिकांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली अशा सर्व महिला व पुरुष ग्रामस्थांचा सन्मान सोहळा
तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्था आणि श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे संपन्न झाला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या औचीत्यांने ग्रंथालय उपक्रमाचा भाग म्हणून श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस ने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपप्रजनाने आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रा.पा.जोशी, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा परब, जैतिरांश्रीत संस्थेचे अध्यक्ष ॲड प्रभांनद सावंत,प्रमुख पाहुणे माजी गट शिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर, उद्योजक दादासाहेब परुळकर, उद्योजक काकासाहेब झांट्ये, श्री शिवाजी हायस्कूल मुख्याध्यापक रामकृष्ण देसाई , उपाध्यक्ष विष्णू परब, देवस्थानचे मानकरी अनिल परब,सोसायटी चेअरमन संतोष शेठकर,जयवंत तुळसकर,कृष्णा तावडे,प्रकाश परब,घोडे- पाटील सर आदी मान्यवर आणि जैतिराश्रीत संस्था आणि वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तुळस सारख्या ग्रामीण भागामध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व ग्रामस्थांचा सन्मान होतो ही गोष्ट इतर गावांनी दखल घेण्यासारखी आहे,असे उपक्रम आपली संस्कृती टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन रा.पा.जोशी यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवर वर्षा परब यांनी मालवणी माणसाच्या स्वभावाचे पैलू उलगडत ज्येष्ठांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून प्रत्येकाला आपल्या वतीने ब्लॅंकेट प्रदान केले. रमेश पिंगुळकर यांनी वृध्दाश्रम आणि आजची कुटुंब व्यवस्था यावर भाष्य केले.सुमारे २०० ज्येष्ठ ग्रामस्थांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ आणि ब्लॅंकेट देऊन करण्यात आला.
यावेळी तुळस गावात शैक्षणिक चळवळ राबणाऱ्या जैतिराश्रीत संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र देऊन झांट्ये काजू उद्योग समूहाच्या वतीने श्री सुधीर झांट्ये यांनी विशेष सन्मान केला. यावेळी गावातील बरेच नागरिक उपस्थित होते. आदर्शवत कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ज्येष्ठांनी समाधानी असल्याचे मनोगत व्यक्त कले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळकर यांनी तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =