*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*’खरचं कोणी कुणाच नसतं’*
************
माय माझी माझ्यासाठी
ऱ्हांदुन ठेवायची
रात्री उशिरा आल्यावर
मला भाकर खातांना
दाराआडून बघायची
नै तेव्हा वट्यावर बसून
माझी वाट बघत असे
माझ्या सोबत तिपण
जेवायला बसे
मी लईदा तिच्यावर वरडायचो
माझी वाट बघत जवू नको
म्हणून दरडायचो
पण ती माय होती
ममतेच्या विरूद्ध
जात नव्हती
मला पाहील्याशिवय
पापणी तिची लवत नव्हती
मी जरासा मोठा झाला
तशात बाप माझ्या सोडून गेला
बाप सोडून गेला आणि मी
उंडारत फिरायला लागलो
बेफिकिरीत जगायला लागलो
रांडकी म्हणून मायला हिनवायचे
नै नै ते बोलून तिला छळायचे
तरीही माय माझ्यासाठी
दिवसभर राबायची
विटाळलेल्या नजरेच्या जखमा
रात्रीला अश्रुंनी पुसायची
अचानक एका रात्री
माय माझ्या मांडीवर
जीव सोडून गेली
जीव सोडून गेली नी
मी पोरका झालो
चारभिंच्या कोनवाड्यात
एकटाच मी पडलो
तव्हा मायचं सागंन
मला आठवायला लागले
माय सांगायची
बाप गेला तस मी गेल्यावर
तुझ कोणीच नसणार
कोणही तुला
आपलं नाही म्हणणार
लोकं तुला
टोचून टोचून बोलतील
मेल्यावर तुला
बेवारश्यासारख जाळतील
जगण खूपच अवघड असतं
कोणी कुणाचं नसतं
तवा कोणाच्या सांगण्यावरून
तू वाट चुकवू नको
डोळे बंद करून हे जग पाहू नको
खरचं की कोणी कुणच नसतं
जाता जाता माय डोळे उघडून गेली
तिच्यामुळे जगण्याला
नवी दिशा मिळाली
आता मी नव्याने जगण्यासाठी
नव्या पहाटेची वाट बघतोय.
*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८