ॲड. संजू शिरोडकर यांची पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या जवळ मागणी
सावंतवाडी
सावंतवाडी शहर दिवसे दिवस विस्तारित होत असून शहराची लोकसंख्या वाढत आहे त्या कारणास्तव शहरांमध्ये मध्यवर्ती शहर पोलीस चौकी चालू करा याबाबतचे निवेदन ॲड. संजू शिरोडकर माजी अध्यक्ष भाजपा सावंतवाडी यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जवळ दिले.
सद्यस्थितीमध्ये चितारआळी उभा बाजार येथे पोलीस ठाणे असलेली जागा तशीच आहे व.या ठिकाणी शहर पोलीस चौकी सुरू करावी जेणेकरून शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एसटी बस स्टॅन्ड, उभा बाजार बाजारपेठ, मुख्य बाजारपेठ, माठेवाडा, सबनीस वाडा, वैश्य वाडा, बाहेरचा वाडा, भटवाडी भागांसाठी सदरची पोलीस चौकी महत्त्वाची तसेच उपयोगी ठरेल. तसेच पोलिसांची गस्त राहिल्यास चोरी तसेच गुन्हांचे प्रमाण कमी होऊन लोकांनाही तक्रार करण्यासाठी सोयीचे मध्यवर्ती ठिकाण उपलब्ध होईल.याच भागामध्ये सुवर्ण व्यवसायिकांची बाजारपेठ देखील आहे त्यांच्यासाठी देखील फार उपयुक्त असे पोलीस ठाणे ठरेल.सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी उपलब्ध आहेत त्यातील काही सहाय्यक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती या शहर पोलीस चौकीमध्ये केल्यास सावंतवाडी मधील जनतेच्या मोठा फायदा होऊ शकेल असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, ॲड. परिमल नाईक, ॲड. अनिल निरावडेकर, सराफ सुवर्णकार जिल्हाध्यक्ष श्रीपाद चोडणकर,मनोज नाईक,उदय नाईक,आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
🚒🚒 *बोअरवेल क्षेत्रांतील खात्रीशीर नाव*🚒🚒
*💧एल.एम. बोअरवेल💧*
🏞️ *३०० फूट लांब, मोठे होल ६”(इंच)बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करून मिळेल.*
*💁♂️ *१००% कामाचा हमी हीच आमची ओळख*
💧💧💧💧💧💧💧💧💧
*💦 ४.५”, ६”, ६.५”, ९*
*💦बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*💦बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*💦पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*💦अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*💦नवीन पंप बसवून मिळतील.*
*बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*💦 होल मारून मिळतील.*
*💦 बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एल.एम.बोअरवेल*
*📌आमचा पत्ता : हुंबरट टीठा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, जि.सिंधुदुर्ग*
*📌 चिंतामणी पार्क, एस एम हायस्कूल समोर, कणकवली, सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. लवू परुळेकर*
*संपर्क 👇*
*📱*9420741599 / 8669193749*
*Advt link*
———————————————-