You are currently viewing माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले दिल्लीत

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले दिल्लीत

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या संबंधित नुकसानग्रस्तांना योग्य ती भरीव मदत करा,त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.दरम्यान सरकारी मदत मिळेपर्यंत पक्षातर्फे वीस हजार आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य मदत दिली जाईल,असा विश्वास श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केला.याबाबत श्री.भोसले यांनी दिल्ली येथे जाऊन श्री.पवार यांची भेट घेतली.यावेळी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पुतणे, सर्वोच्च न्यायालयाचे वकील श्री . संग्रामसिंह भोंसले तसेच श्री. आशिष शिरोडकर सुद्धा उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − four =