You are currently viewing स्थिर व भरारी पथकामार्फत अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

स्थिर व भरारी पथकामार्फत अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

८९ वाहनांवर कारवाई; मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती

 

सिंधुदुर्गनगरी :

 

अनधिकृत वाळू वाहतूक रोखण्यासाठी निर्माण केलेल्या स्थिर व भरारी पथकामार्फत महसूल विभागाकडून तब्बल ८९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातून तब्बल ७० लाख ८९ हजार ७३० इतका दंड वसूल करण्यात जाला अशी माहिती मालवण तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिली. कालावल खाडीपात्रात शुभम शंकर रेवडकर, पंढरीनाथ सुरेश हडकर, प्रविण जगन्नाथ खोत, अरुण दयाळ खोत व आदित्य प्रमोद कावले अशा एकूण ५ वाळू लिलावधारकांना परवानगी देण्यात आलेली आहे.

तसेच बाळू गट सी २ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. मसुरे जुवा बेट नजीक कालावल खाडीपात्रात होणाऱ्या अधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी संबंधीत मंडळ अधिकारी हे अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभे केलेले रॅम्प तक्रार प्राप्त होताच नष्ट करण्यात येत असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − two =