You are currently viewing राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा आठवा क्रमांक

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा आठवा क्रमांक

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा आठवा क्रमांक*

मालवण

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत संशोधन विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ मध्ये प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर खरारे येथील प्राथमिक शिक्षक गणेश नाईक यांचा आठवा क्रमांक आला.
प्रतीवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत संशोधन विभागामार्फत नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी झालेल्या नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर खरारे येथील गणेश नाईक यांचा जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक आला होता. जिल्हास्तरावरील पहिल्या पाच स्पर्धेकांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली. राज्यभरातून प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक या गटात आलेल्या १८० स्पर्धेकांमधून गणेश नाईक यांच्या ‘वाचू आनंदे’ या नवोपक्रमाचा आठवा क्रमांक आला. पहिल्या दहा क्रमांकांचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
या नवोपक्रमासाठी डॉ लवू आचारेकर आणि सुनील करडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग चे प्राचार्य कांबळे साहेब, सर्व अधिव्याख्याता, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, पालक यांनी अभिनंदन केले.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा