You are currently viewing जिल्हास्तरीय आदर्श युवा आंबा बागायतदार पुरस्कार उत्तम फोंडेकर यांना जाहीर

जिल्हास्तरीय आदर्श युवा आंबा बागायतदार पुरस्कार उत्तम फोंडेकर यांना जाहीर

मालवण : 

 

सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय आदर्श युवा आंबा बागायतदार पुरस्कार मालवण तालुक्यातील कुंभारमाठचे प्रगतशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना जाहीर झाला आहे.

उत्तम फोंडेकर यांनी यापूर्वी तीन वर्ष राज्यात पहिली हापूस आंब्याची पेटी पाठवली होती. जपानच्या वांग चूक या आंबा बागायतदारचे रेकॉर्ड ब्रेक करण्याचा पराक्रम फोंडेकर यांच्या नावावर नोंद आहे.

सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाने फोंडेकर यांची आंबा उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन त्यांना आदर्श युवा आंबा बागायतदार हा पुरस्कार जाहीर केला आहे.

यापूर्वी दिल्ली येथील आयकॉनिक अवॉर्ड कार्यक्रमात उत्तम फोंडेकर यांना दि प्राइड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच इतर अनेक संस्थांकडून देखील फोंडेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. श्री. फोंडेकर यांना ज्ञानदीप मंडळाचा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + thirteen =