बांदा
कामत चॅरिटेबल ट्रस्ट, दिशा फाउंडेशन कास यांच्यावतीने शाळा कास नंबर १ मधील मुलांना १०८ रुग्णवाहिका व गुड टच, बॅडटच यासंबधीचे मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन १०८ च्या डॉक्टर अनघा बांद्रे यांनी १०८ ला फोन कसा करावा इथपासून त्या अद्ययावत १०८ मध्ये कोणकोणती उपकरणे असतात त्या विषयी माहिती दिली. तर मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कसा ओळखावा या बद्दलची माहिती दिली. यावेळी दिशा फौंडेशनच्या अध्यक्षा मंगल कामत, डॉ. अनघा बांद्रे, मुख्याध्यापिका नाईक, पालव सर, गावडे सर आदि सर्व शिक्षक उपस्थित होते.