You are currently viewing सावंतवाडीत राष्ट्रवादी कडून होणार उद्या महिलांचा सन्मान…

सावंतवाडीत राष्ट्रवादी कडून होणार उद्या महिलांचा सन्मान…

सावंतवाडी

येथील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत येथील श्रीराम वाचन मंदिरात घेण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला, युवती, बेसिक, युवक तसेच सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा