वेंगुर्ला
हिदू धर्माभिमानी मंडळींतर्फे आज वेंगुर्ला शहरात काढण्यात आलेल्या सावरकर सन्मान यात्रेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो सावरकर प्रेमींनी यात सहभागी होत ही सावरकर सन्मान यात्रा यशस्वी केली.
या यात्रेची सुरुवात येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर येथून झाली. शिरोडा नाका, दाभोली नाका, बाजारपेठ, मारुती स्टॉप मार्गे येऊन पुन्हा रामेश्वर मंदिर येथे या यात्रेची सांगता झाली. या यात्रेत विश्व हिदू परिषद, हिदू जनजागरण समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वारकरी सांप्रदायिक, नरेंद्र महाराज अनुयायी आणि सावरकर प्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. यात्रेदरम्यान, देशाचा सन्मान सावरकर, देशाचा अभिमान सावरकर, त्यागाचा आदर्श सावरकर, मातृभूमी पुजक सावरकर, क्रांतीचा उद्घोष सावरकर, प्राणाची तळमळ सावरकर, जयोस्तुतेचा जयघोष सावरकर अशा घोषणा देण्यात आल्या. या यात्रेच्या सांगतेनंतर ह.भ.प.संदिप बुवा माणके (पुणे) यांचे ‘हिदू धर्माभिमानी सावरकर‘ यावरील कीर्तनाला प्रारंभ झाला.