You are currently viewing भाजपाकडून महाविजय अभियानांतर्गत होणार जि. प. निहाय मेळावे…

भाजपाकडून महाविजय अभियानांतर्गत होणार जि. प. निहाय मेळावे…

वेंगुर्ले :

वेंगुर्ले येथील भाजपाच्या वतीने महाविजय अभियाना अंतर्गत ९ व ११ एप्रिलला जिल्हा परिषद निहाय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी दिली. दरम्यान या अभियानात तालुक्यातील भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रक देण्यात आले.
त्यात असे नमूद केले आहे की, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपुर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात “महाविजय अभियान २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत संघटन , निवडणुक व्यवस्थापन , सरकार , विषय , मुद्दे , समिकरण , रणनिती या सर्व विषयांचा सहभाग आहे. निवडणुक तयारी सर्व स्तरावर करण्यासाठी संघटनेतील बुथ स्तरापासून तर प्रदेश स्तरापर्यंत या मिशन मध्ये सहभागी होण्यासाठी महाविजय २०२४ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ९ व ११ एप्रिलला वेंगुर्ले तालुक्यात जिल्हा परिषद निहाय मेळावे घेण्यात येणार आहेत. तरी अभियानामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा श्री. देसाई व श्री. गवंडळकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा