You are currently viewing सातरल-कासरल विकास सोसायटीवर भाजपचा झेंडा

सातरल-कासरल विकास सोसायटीवर भाजपचा झेंडा

कणकवली

तालुक्‍यातील सातरल कासरल सोसायटीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. या सोसायटी निवडणुकीत भाजपचे सर्व ११ उमेदवार विजयी झाले.या विजयी उमेदवारांचे अभिनंदन जिल्‍हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले. यावेळी भाजपा कोकण विभागीय संघटक शैलेंद्र दळवी, भाजपा ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष महेश गुरव, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक समीर सावंत, भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, सोनू सावंत, संदीप मेस्त्री, संदीप सावंत, माजी सभापती प्रकाश सावंत, पिसेकामते सरपंच सुहास राणे वरवडे उपसरपंच अनिल घाडीगावकर, संदीप सावंत, समीर प्रभूगावकर, अभय गावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा