You are currently viewing खाजगी शाळांकडून वसुली केल्या जाणाऱ्या फि संदर्भात मनसेकडून गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर  

खाजगी शाळांकडून वसुली केल्या जाणाऱ्या फि संदर्भात मनसेकडून गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर  

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्‍यातील काही खाजगी शाळांकडून वसुली केला जाणाऱ्या फि संदर्भात पंचायत समिती सावंतवाडीच्या गट शिक्षण अधिकारी सौ कल्पना बोडके यांना मनसे तर्फे निवेदन देण्यात आले.

करोना काळात गेले सात ते आठ महिने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत तसेच लोकांची रोजगार देखील बुडाले आहेत तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकरी देखील मेटाकुटीस आलेला आहे अशा परिस्थितीत मागील काही दिवस खाजगी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांच्या मागे फी साठी तकादा लावत आहेत शैक्षणिक संस्थांची अव्वाच्या सव्वा फी भरणे आर्थिक परिस्थितीमुळे पालकांना शक्य नाही तसेच फी संदर्भात राज्य सरकारचे निर्देश आहेत.
तरी करोना काळात फी साठी तगदा लावणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांची तात्काळ चौकशी करण्यात यावी व या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याा आशयाचे निवेदन मनसेतर्फे पंचायत समिती सावंतवाडीच्या गट शिक्षण अधिकारी सौ कल्पना बोडके यांना देण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर सचिव विठ्ठल गावडे मनविसे तालुकाध्यक्ष ओमकार कुडतरकर शुभम सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − four =