You are currently viewing २२ व २३ एप्रिल रोजी कुडाळात गरजवंत बालरुग्णांच्या शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम 

२२ व २३ एप्रिल रोजी कुडाळात गरजवंत बालरुग्णांच्या शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम 

कुडाळ :

 

कुडाळ येथील सुशिला गणेश निगुडकर ट्रस्टचे डॉ. संजय निगुडकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर आणि मूळ सिंधुदुर्गातील व सध्या मुंबईस्थित डॉ. अमेय देसाई यांनी सुरू केलेल्या जिल्ह्यातील गरजवंत बालरुग्णांच्या शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम २२ व २३ एप्रिल रोजी येथील महिला-बाल रुग्णालयात आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने डॉ. श्रीपाद पाटील यांच्या सहकार्याने हे शिबीर होत आहे. या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक व मुंबईतील सायन रुग्णालयातील बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. पारस कोठारी आणि त्यांची टीम दोन दिवस गरजवंत लहान मुलांवर विनामूल्य तत्त्वावर शस्त्रक्रिया करणार आहेत. शिबिरात हर्निया, हायड्रोसिल, अन-डिसेंडेड टेस्टीस, अपेंडिक्स, हायपोस्पाडिया, अशा शस्त्रक्रिया होणार आहेत. याकरिता अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच शिबिरातील बाल रुग्णांसोबत रुग्णालयात राहणाऱ्या एका पालकाची भोजनाची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने करण्यात आली आहे. २२ एप्रिल दुपारी तीन वाजता शस्त्रक्रियांना सुरूवात होणार आहे. रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत साधारणतः २५ शस्त्रक्रिया होणार आहेत असे डॉ. अमेय देसाई यांनी सांगितले. या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. निगुडकर, डॉ. देसाई व गाळवणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा