हॉर्टिनेट प्रणालीवर फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲपव्दारे करावी
– कृषि संचालक (फलोउत्पादन)
सिंधुदुर्गनगरी
कोविड-19 च्या महामारीमुळे शेतकऱ्यांना कृषि विभागाकडे जाणे-येणे अडचणीचे झाले आहे. यापासून मुक्तता मिळावी यासाठी जिल्ह्यातील निर्यातक्षम आंबा व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातक्षम आंबा व भाजीपाला पिकांची नोंदणी हॉर्टिनेट प्रणालीवर फॉर्म रजिस्ट्रेशनसाठी अपेडाने विकसित केलेल्या ॲपवर करावी. असे आवाहन पुणे कृषि संचालक (फलोउत्पादन) यांनी केले आहे.
ॲड्राईड मोबाईल वर गुगल प्ले स्टोअरमध्ये अपेडाने विकसीत केलेल्या फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.apeda.apedaapp या लिंकवर क्लिक करावे. त्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीत स्वत:चे नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक व ई-मेल आयडी भरल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.या प्रकरणी काही अडचणी आल्यास जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.