You are currently viewing आई थोर तुझे उपकार

आई थोर तुझे उपकार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालीत्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आई थोर तुझे उपकार*

 

हाताचा करून पाळणा

जोजविलेस रात्र रात्र

आनंदाने फुलले तुझे

माझ्यासाठी गात्र नि गात्र🌹

बाळासाठी तुझ्या ग!

वर्षविल्यास अमृत धारा

दुग्धामृताचे प्राशन होता

पोषविलास मम पिंड सारा🌹

 

बोट धरूनी चालविले

दाविली मज जिवनवाट

शिक्षण देऊनी मजला

प्रकाशिलास जिवनघाट🌹

 

संस्कारांचा अनमोल ठेवा

ठेविलास मम हाती

गृहस्थाश्रमी प्रवेशिता

वापरले तेच संस्कार मोती🌹

 

आमुच्या सुखासाठी

कष्टलीस तू अपार

आई! कसे पांग फेडू

थोर तुझे ग,उपकार🌹

 

तुझे नांव राखण्या

शर्थीचे करीन प्रयत्न

सतत तुझी आठवण

संसारी समाधानी यत्न.🌹

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा