You are currently viewing जय जय हनुमान गुसाँई।

जय जय हनुमान गुसाँई।

*ज्येष्ठ लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा, निगडी पुणे लिखित श्री.हनुमान जयंती उत्सव निमित्त अप्रतिम लेख*

*जय जय हनुमान गुसाँई।*

प्रत्येक गावात वेशी बाहेर मारूती चे मंदिर असतेच. गावात लग्नासाठी येणारे वऱ्हाड तिथे उतरते. वर तोवर ब्रह्मचारी असतो.
उत्तर भारतात हनुमान यांना खूप मानतात. हनुमान चालीसा चे रोज तिथे पठण केले जाते. चैत्र महिन्यात पौर्णिमेला हनुमान यांचा जन्म झाला.
आपण रामायणात हनुमान यांना पवन आणि अंजनी यांचे पुत्र मानतो. एक कथा अशीही आहे की दशरथ राजाने केलेल्या यज्ञात अग्नी देवाने खिरी चा कुंभ राजाला दिला आणि सर्व राण्यांना सारखा प्रसाद त्वरित भक्षण करण्यास सांगितले. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना तीन भाग देण्यात आले. कैकेयी चे पात्र घारीने झेप घालून उचलले. ते समजताच कौसल्या, सुमित्रा यांनी आपल्या प्रसादाचा काही भाग कैकेयी ला दिला. कौसल्येस राम, सुमित्रेस लक्ष्मण तर कैकेयी ला भरत आणि शत्रुघ्न पुत्ररत्न झाले.
घारीने प्रसाद पात्र खाली सोडले. अंजनी आपल्या आश्रमात तुळशीची पूजा करत होती. अर्ध्य देण्यासाठी हाताची ओंजळ पुढे केली तोच प्रसाद पात्र हातात पडले. देवाचा प्रसाद मानून ते सेवन केले. यामुळे अंजनी च्या पोटी हनुमान जन्मले. नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी हे हनुमानांचे जन्मस्थळ होय.
आपल्या वेदपुराणांपासून मान्य असलेल्या सप्तचिरंजीवांपैकी रामभक्त हनुमान एक आहेत. शक्तीदाता म्हणून त्यांना बाल, किशोर,तरूण वर्ग पूजतो. तालीम, व्यायामशाळा मध्ये त्यांची तसबीर असते.बलोपासना करण्यासाठी केवळ हिंदू नव्हे तर मुस्लिम, ख्रिस्ती युवक देखील वीर हनुमान यांना मानतात.
समर्थ रामदास यांनी युवकांना प्रेरित करण्यासाठी ११ मारुतींची स्थापना केली. चाफळचा वीर मारुती आणि प्रताप मारुती, माजगाव, शिंगणवाडी, उंब्रज, मसूर, शहापूर, शिराळे, बहे बोरगाव, मनपाडळे, पारगाव हे मारूती होत.
सह्याद्री च्या डोंगर दऱ्यांमध्ये मराठा समाजाला एकत्र आणण्याचे काम यानिमित्ताने झाले. शिवाजी महाराजांना नेहमी स्वामी समर्थांनी योग्य सल्ले दिले.

ब्रम्हांड पुराणानुसार मतिमान, श्रुतिमान, केतुमान, गतिमान, धृतिमान अशी त्यांची भावंडे आहेत.
समुद्रावरून उड्डाण करत असताना हनुमानांचा जो घाम पडला त्याला मगरीने गिळले. हनुमान जरी ब्रम्हचारी होते तरी मगरीने घाम गिळल्यामुळे तिला जो मुलगा झाला त्याचे नाव मकरध्वज.
हनुमान हे शास्त्रप्रवीण, राजनीतिज्ञ, शौर्य, बुद्धिमत्ता, ब्रह्मचर्य, रामभक्ती, वक्तृत्व इ. अलौकिक गुणांची मूर्ती. गदा हे त्यांचे मुख्य आयुध.
राम, लक्ष्मण, सीता वनवासाकरता आले तेव्हा सुग्रीव यांच्या मंत्रिमंडळात हनुमान मंत्री होते. बालीचा वध केल्यानंतर हनुमान मदत करण्यासाठी त्यांच्याबरोबर निघाले.
सीताशोध, अशोकवनविध्वंस, लंकादहन ही हनुमान यांची काही गौरवान्वित करणारी अचाट कृत्ये होत. संजीवनी बुटी आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता.
हनुमान, हनुमंत, मारूती, अंजनेय, पवनसूत, बजरंगबली,केसरीनंदन काहीही म्हणा ते भक्तांच्या हाकेला धावून येतात. संकट निवारण करतात.
मशिदीच्या अजान, बांगेला उत्तर म्हणून हनुमान चालीसा सुरू करणारे राजकारणी यांना श्रध्देशी काही देणेघेणे नाही. ते आपला मतलब साधतात.

-बाबू फिलीप डिसोजा
हिमगौरी बिल्डिंग २१,
सेक्टर २१,स्कीम१०,
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा